शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तू जे करते ते योग्यच आहे असं…”, जया बच्चन यांनी लेकीलाही सोडलं नाही, तिच्याच अंगावर ओरडल्या अन्…; म्हणाल्या, “दुसऱ्यांनाही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 11, 2024 | 4:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jaya bachchan on Shweta nanda

"तू जे करते ते योग्यच आहे असं...", जया बच्चन यांनी लेकीलाही सोडलं नाही, तिच्याच अंगावर ओरडल्या अन्...; म्हणाल्या, "दुसऱ्यांनाही..."

बॉलिवूड अभिनेत्री जय बच्चन या आपल्या बेधडक वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. प्रत्येक विषयावर त्या आपले मत परखडपणे मांडत असतात. त्यामुळे काही वेळेस त्यांना ट्रोलही केले जाते. नुकत्याच त्या नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये मुलगी श्वेता नंदाबरोबर उपस्थित राहिल्या होत्या. या पॉडकास्टमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाल्या. जया यांनी सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्सबद्दलही दिलखुलासपणे चर्चा केली असून नेटकऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच काहीही बोलताना विचार करुन बोलण्याचा सल्लाही दिला. आता पुन्हा एकदा त्यांच्या रोषाचा सामना श्वेताला करावा लागला आहे.

जया यांनी नव्या नवेलीच्या ‘व्हॉट द हेल’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. श्वेतादेखील या पॉडकास्टमध्ये आली होती. त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया नव्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना श्वेता मध्येच बोलते त्यामुळे जया श्वेताला ओरडताना दिसत आहेत.   

आणखी वाचा – Video : इतकी सुंदर दिसते आशा भोसले यांची नात, त्याक्षणी स्टेजवरच आजीचे पाय धरुन रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by What The Hell Navya (@wthn_official)

सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इंटरनेटमुळे व्यक्तीच्या  आयुष्यावर कसा परिणाम होतो ? या प्रश्नाचे उत्तर जया देत असतात. त्यामध्येच श्वेतानेही आपले मत सांगितले. त्यावर जया तिच्यावर चिडल्या आणि म्हणाल्या, “दुसऱ्यांनाही बोलण्याची संधी द्यावी आणि कोणीही इतकं आत्मकेंद्रित असू नये”. पुढे त्या म्हणाल्या की, “दुसऱ्यांच्या मतांचा आदर करावा. कारण प्रत्येकाचे मत हे प्रत्येक विषयावर वेगवेगळे असते”. त्यावर श्वेता म्हणाली की, “आपले मत मांडणे हाच या पॉडकास्टचा प्राथमिक उद्देश आहे”. तेव्हा जया उत्तर देत म्हणतात की, “आपले मत मांडणे म्हणजे तुम्ही जे करत आहात ते योग्य आहेच असे नाही”.

आणखी वाचा – “बुरख्याच्या आत बिकिनी घालून आली अन्…”, राखी सावंत ‘मैं हूं ना’च्या वेळी केला होता कहर, फराह खानचा खुलासा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम…”

या पॉडकास्टमध्ये जया यांनी मानसिक आरोग्यावरही भाष्य केले आहे. मानसिक आरोग्यावर मांडलेल्या मतामुळे त्यांना अनेक प्रतिक्रियांचाही सामना करावा लागला. काही दिवसांपूर्वी जया आपल्या कुटुंबासहित आकाश अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी फोटोग्राफर्सना दिलेल्या स्मितहास्यामुळे खूप चर्चेत आल्या होत्या.

Tags: jaya bachchannavya naveli nandapodcastshweta nandasocial mediavideoviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sidhu moosewala mother charan kaur admitted hospital she set to deliver twins see the details

सिद्धू मुसेवालाची आई ५८व्या वर्षी गरोदर, जुळ्या मुलांना देणार जन्म, रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.