आशा भोसले हे नाव कोणाला माहीत नाही? आपल्या आवाजाने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेसह अनेकदा आपण एक मुलगी पाहतो जिचं नाव आहे जनाई भोसले. आशा भोसले यांच्या मुलाची ही मुलगी अर्थात आशा भोसले यांची नात. अनेक कार्यक्रमांना आशा भोसले यांच्यासह जनाई हजेरी लावताना दिसते. जनाई भोसले सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. जनाई ही एक उत्तम गायिका असण्याबरोबरच एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.
अशातच जनाईच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे जनाई लवकरच मनोरंजन सृष्टीत पदार्पण करत आहे. ती लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्याव झळकणार आहे. जनाई लवकरच ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होईल. दिग्दर्शक संदीप सिंह जनाईला लाँच करणार आहेत.
या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. संदीप सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत जनाईच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल घोषणा केली आहे. ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सई भोसले या आम्ही जनाईचे स्वागत करत आहोत असं म्हणत त्यांनी जनाईबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे.
जनाई ही आशा भोसले यांचे पूत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. उत्तम गायिका असलेली जनाई आता अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. कोणत्याही अभिनेत्रीला मात देईल असं सौंदर्य जनाईचं असून स्टाईलच्या बाबतीतही जनाई मागे नाही. केवळ २० वर्षांची जनाई ही सोशल इन्फ्लुएन्सर असून उद्योजिकादेखील आहे.
दरम्यान, जनाईच्या या नवीन चित्रपटासाठी व या चित्रपटातील तिच्याअ नीवण भूमिकेसाठी तिचे अनेक चाहते आतुर आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्याअ नवीन भूमिकेसाठी उत्सुकता दर्शवली आहे.