बॉलिवूड अभिनेत्री जय बच्चन या आपल्या बेधडक वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. प्रत्येक विषयावर त्या आपले मत परखडपणे मांडत असतात. त्यामुळे काही वेळेस त्यांना ट्रोलही केले जाते. नुकत्याच त्या नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये मुलगी श्वेता नंदाबरोबर उपस्थित राहिल्या होत्या. या पॉडकास्टमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाल्या. जया यांनी सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्सबद्दलही दिलखुलासपणे चर्चा केली असून नेटकऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच काहीही बोलताना विचार करुन बोलण्याचा सल्लाही दिला. आता पुन्हा एकदा त्यांच्या रोषाचा सामना श्वेताला करावा लागला आहे.
जया यांनी नव्या नवेलीच्या ‘व्हॉट द हेल’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. श्वेतादेखील या पॉडकास्टमध्ये आली होती. त्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया नव्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना श्वेता मध्येच बोलते त्यामुळे जया श्वेताला ओरडताना दिसत आहेत.
सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इंटरनेटमुळे व्यक्तीच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो ? या प्रश्नाचे उत्तर जया देत असतात. त्यामध्येच श्वेतानेही आपले मत सांगितले. त्यावर जया तिच्यावर चिडल्या आणि म्हणाल्या, “दुसऱ्यांनाही बोलण्याची संधी द्यावी आणि कोणीही इतकं आत्मकेंद्रित असू नये”. पुढे त्या म्हणाल्या की, “दुसऱ्यांच्या मतांचा आदर करावा. कारण प्रत्येकाचे मत हे प्रत्येक विषयावर वेगवेगळे असते”. त्यावर श्वेता म्हणाली की, “आपले मत मांडणे हाच या पॉडकास्टचा प्राथमिक उद्देश आहे”. तेव्हा जया उत्तर देत म्हणतात की, “आपले मत मांडणे म्हणजे तुम्ही जे करत आहात ते योग्य आहेच असे नाही”.
या पॉडकास्टमध्ये जया यांनी मानसिक आरोग्यावरही भाष्य केले आहे. मानसिक आरोग्यावर मांडलेल्या मतामुळे त्यांना अनेक प्रतिक्रियांचाही सामना करावा लागला. काही दिवसांपूर्वी जया आपल्या कुटुंबासहित आकाश अंबानी व राधिक मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी फोटोग्राफर्सना दिलेल्या स्मितहास्यामुळे खूप चर्चेत आल्या होत्या.