बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 6, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir khan talk about his girlfriend

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण...

आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चित्रपटाबरोबरच आमिरचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा टॉक ऑफ द टाउन ठरलं आहे. ६०व्या वर्षीही तो तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. गौरी स्प्रॅटला तो डेट करत आहे. विशेष म्हणजे दोन घटस्फोटानंतर त्याने गर्लफ्रेंडबरोबरचं नातं जगजाहिर केलं. आमिरने त्याचं नातं लपवून ठेवलं नाही. आमिर व गौरीचं नातं त्यांच्या कुटुंबियांनाही मान्य आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने गर्लफ्रेंड गौरीचं कौतुक केलं. तसेच आयुष्यात तिनेच स्थिरता आणली असल्याचं आमिरचं म्हणणं आहे. (Aamir khan talk about his girlfriend)

तिसऱ्यांदा प्रेमात पडूनही तू नातं जगजाहिर केलं. काहीजणं आपलं नातं लपवतात. पण तू रिलेशनशिप ऑफिशिअल करण्यामागचं कारण काय? असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “प्रेम लपवून ठेवणं मला चांगलं वाटत नाही. एखाद्या व्यक्तीचा हात हातात घेत मी आयुष्यभर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे तर ते जगजाहिर करावं असं वाटतं. तसं केलं नाही तर लोकांसमोर त्या व्यक्तीचा मी आदर करत नाही असं होतं. सगळ्यांसमोर आदर न करणं माझ्यामते तरी योग्य नाही. मी जिथे माझ्या जोडीदाराबाबतच बोलू शकत नाही तर तिलाही तितकंच दुःख होणार. मी असं कोणतचं काम करु नये ज्यामुळे माझा जोडीदार दुखावेल. कोणाचं मन दुखावू नये ही शिकवण माझ्या आईनेच मला दिली आहे”.

आणखी वाचा – “खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

एका विशिष्ट वयातील लोकांनाच प्रेम होऊ शकतं असं बोललं जातं. त्यामध्येही ती ६०मध्ये प्रेम केलंस. असा प्रश्न विचारताच आमिर म्हणाला, “दिल तो बच्चा है जी. गौरी स्पेट स्वभावाने खूपच शांत आहे. तिचा स्वभाव, वागणूक खूपच सुंदर आहे. ती प्रत्येक गोष्ट अगदी शांत मनाने करते. मी तिच्या अगदी उलट वागतो. मी ३६ तास सलग काम करतो. त्यानंतर ३६ तास सलग झोपतो. माझं आयुष्यही अगदी तसंच आहे. मी माझ्या विचारांमध्येच गुंतलेला असतो. आमचा स्वभाव विरुद्ध दिशेचा आहे. पण दोन विरुद्ध लोकच एकमेकांप्रती परफेक्ट असतात असंच आमचं काहीसं आहे. माझ्या आयुष्यात स्थैर्य, शांती ती घेऊन आली आहे. त्याचबरोबरीने मी तिच्याबरोबर असल्यापासून तिचं आयुष्य अधिक उत्साही झालं आहे. माझ्यामुळे तिच्या आयुष्यातील उत्साह अधिक वाढत राहो असं मला वाटतं”.

आणखी वाचा – हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः नाकारला. तेव्हा आमिरची अवस्था वाईट होती. या कठीण काळामध्ये कुटुंबाने उत्तम साथ दिली असल्याचं आमिरचं म्हणणं आहे. तो म्हणाला, “१८ वर्षांनंतर एक फ्लॉप चित्रपट माझ्या नशिबी आला. ते मी सहन करु शकलो नाही. त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. त्यादरम्यान किरण राव, मुलगा आजाद, आई, बहीण, जावई, मुलगी सगळेच माझ्याजवळ येऊन बसायचे. गप्पा मारायचे. त्यावेळी कुटुंबाचं मी जे प्रेम अनुभवलं ते प्रेम याआधी मी कधीच अनुभवलं नव्हतं. फ्लॉप चित्रपटांनंतर कुटुंबाचं इतकं प्रेम मिळतं हे आधीच कळालं असतं तर आणखीन फ्लॉप चित्रपट बनवले असते. (आमिर हसत म्हणाला). कुटुंबामुळेच मी पुन्हा उभा राहिलो. आपली चूक कुठे झाली? याचा अभ्यास केला”. आमिर आता नव्या गर्लफ्रेंडसह सुखाने आयुष्य जगत आहे.

Tags: aamir khanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Dia Mirza Pregnancy

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.