शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 6, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anushka Sharma And Virat Kohli

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई...

Anushka Sharma And Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली याक्षणी खूप आनंदी आहेत. विराट कोहलीच्या टीम आरसीबीने आयपीएल सामना जिंकत हवा केली. विराट कोहलीच्या संघाने २३ जून रोजी आयपीएलच्या अंतिम सामन्यात घवघवीत यश मिळवलं. अनुष्का तिचा नवरा विराटच्या विजयामुळे खूप खूष आहे. तिने हा विजय विराटबरोबर साजराही केला. दोघांनी एकत्र या खास क्षणाचा आनंद लुटला. विराट कोहली आणि अनुष्का नेहमीच आलिशान आयुष्य जगताना दिसतात. नेहमीच ते काही ना काही पोस्ट करत त्यांच्या ग्लॅमरस दुनियेबाबत अपडेट देत असतात. सध्या ही जोडी परदेशात त्यांच्या कुटुंबासह स्थायिक झाली आहे. अशा या नेहमीच चर्चेत असणाऱ्या जोडीच्या नेटवर्थबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत…

अनुष्का शर्मा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.  Siasat च्या मते, अनुष्का शर्माची निव्वळ कमाई २५५ कोटी रुपये आहे. अनुष्का तिच्या कपड्यांचा ब्रँड नशमधून आणि जाहिरातींमधून पैसे कमावते. यापूर्वी अनुष्का प्रॉडक्शनमधूनही पैसे कमवत असत. पण आता ती प्रॉडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्म तिचा भाऊ सांभाळतो. अनुष्का शर्मा ब्रँड एन्डोर्समेंटपासून ५ ते १० कोटी कमावते.

आणखी वाचा – ‘शिवा’ maliketil एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

अनुष्का शर्माचा नवरा विराट कोहलीची कमाई
विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर तो भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. अहवालानुसार, त्याची निव्वळ कमाई १०५० कोटी आहेत. त्याला दरवर्षी बीसीसीआयकडून ७ कोटी रुपये मिळतात आणि आयपीएल २०२५ मध्ये २१ कोटी रुपये पगार त्याला प्राप्त झाला आहे.cआयपीएल सामना जिंकल्यानंतर, विराटच्या टीम आरसीबीला बक्षीस म्हणून २० कोटी रुपये मिळाले आहेत. वर्षानुवर्षे विराट कोहलीने आयपीएलकडून २०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आयपीएलच्या सुरूवातीस, विराटला तीन वर्षांसाठी १२ लाख रुपये पगार मिळाला. मग ते ८.२८ कोटी पर्यंत वाढले. २०१४ ते २०१७ पर्यंत ही रक्कम १२.५ कोटी झाली. विराटचा आयपीएल पगार २१ कोटी आहे. या व्यतिरिक्त, विराट कोहली बऱ्याच मोठ्या ब्रँडच्या जाहिराती करतो. यासाठी तो ७.५ कोटी ते १० कोटी ब्रँड एन्डोर्समेंट्स पर्यंत शुल्क आकारतो. विराट कोहली देखील एक व्यावसायिक आहे. त्याचे फॅशन लेबल देखील Wrogn असे आहे. या व्यतिरिक्त, तो एक ८ कम्युन नावाची रेस्टॉरंट साखळीही चालवितो.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

अनुष्का आणि विराट यांच्याकडे गुरुग्राम, मुंबई आणि अलिबाग येथे घर आहेत, ज्याची किंमत सुमारे १०० कोटी आहे. दोन्हीची एकूण संपत्ती सुमारे १३०० कोटी रुपये आहे. अनुष्का आणि विराट यांनी २०१८ मध्ये लग्न केले. दोघेही आनंदी विवाहित आयुष्य जगत आहेत. त्यांना दोन मुले वामिका आणि अकाय आहेत. अनुष्का शर्मा बर्‍याच काळापासून मोठ्या स्क्रीनवर दिसली नाही. शेवटच्या वेळी ती ‘शून्य’ चित्रपटात दिसली. या व्यतिरिक्त तिने फिल्म आर्टमध्ये कॅमिओ भूमिका साकारली. आता तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपटही येत होता. पण हा चित्रपट पुढे ढकलला आहे. चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Tags: anushka sharmaIPL 2025virat kohli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Aamir khan talk about his girlfriend

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.