कोरियोग्राफर, दिग्दर्शक, जज, सेलिब्रिटी फराह खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच एका मुलाखतीत फराह हिने राखी सावंतबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फराहने खुलासा केला की, ती ‘तीस मार खान’साठी कतरिनाला कास्ट करण्याच्या बाजूने नव्हती. त्याच वेळी, तिने ‘मैं हूं ना’ चित्रपटाशी संबंधित एक विचित्र किस्सा सांगितला. या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत तिने भाष्य केलं. तसेच राखी सावंतचे ऑडिशन कसे होते?याबाबतही तिने भाष्य केलं. (Farah Khan On Rakhi Sawant)
फराह खानने कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, ‘दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत ‘मैं हूं ना’च्या शूटिंगमध्ये सामील झाली होती. तिने यापूर्वी आणखी एका अभिनेत्रीला कास्ट केले होते, मात्र तिच्या आईने शाहरुखबरोबर त्याच हॉटेलमध्ये राहण्याची मागणी केली होती’. फराहने सांगितले की, “तिच्या आईने सांगितले की ती एका मोठ्या हॉटेलमध्ये, ज्या हॉटेलमध्ये शाहरुख आहे तिथेच राहणार. शुटिंगच्या आधीपासूनच त्याचे अनेक तांडव सुरु होते”.
फराहने सांगितले की, तिने तिच्या असिस्टंटला फोन केला आणि विचारले की या भूमिकेसाठी कोणाचे ऑडिशन होते. फराहने सांगितले की, ‘राखीचं ऑडिशन झालं जिथे ती बुरखा घालून आली होती’. ऑडिशनची आठवण सांगताना ती म्हणाली, “राखी बुरखा घालून परीक्षेसाठी आली होती. असिस्टंटला जरा धक्काच बसला कारण ही भूमिका एका बिनधास्त मुलीची होती”.
मात्र, राखीने तिच्या खास शैलीत कॅमेरामॅनला कॅमेरा फिरवण्यास सांगितले. तिने बुरखा काढताच साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण तिने बुरख्याखाली बिकिनी घातली होती. मात्र, तिचे केस कुरळे असल्याने तिला लगेच कास्ट केले नाही. ती जेव्हा दार्जिलिंगला आली तेव्हा तिचे कसे लपवायचे असा प्रश्न होता. मी तिला स्वेटर आणि कॅप दिली जी तिला सर्वांना दाखवायची होती”. राखीसोबत काम करणे खूप आनंददायी असल्याचे फराहने सांगितले. “तिच्याबरोबर काम करुन खूप छान वाटलं. तिची एकच विनंती होती की, तिला गाण्यात शाहरुखच्या शेजारी किंवा त्याच्या मागे उभे केले जावे”.