गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 6, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
muzammil Ibrahim on pooja bhatt

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन...”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्...

बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे पूजा भट्ट. महेश भट्ट यांची लेक पूजा सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होत पूजाची नवी बाजू प्रेक्षकांसमोर आली. पण सेटवर पूजा सहकलाकारांना शिवीगाळ करत असल्याचं चित्र समोर आलं आहे. ‘धोखा’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा अभिनेता मुजम्मिल इब्राहिमने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. सेटवर पूजाने क्रुरतेची वागणूक दिली असल्याचा दावा त्याने केला. तसेच पूजा शिवीगाळ करत असल्याचंही त्याने सांगितलं. त्याने पूजाची खरी बाजू प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. (muzammil Ibrahim on pooja bhatt)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुजम्मिल म्हणाला, “पूजा भट्ट खूप अनप्रोफेशनल आहे. ती शूटदरम्यान बऱ्याच गोष्टी बोलली आहे. तिचा एक स्वभाव आहे आणि तो खूपच विचित्र आहे. तिचा एटीट्युडमुळे कलाकारांसाठी काम करणं खूपच कठीण होऊन जातं. भट्ट साहेबांना (महेश) मी आवडायचो. मी त्यावेळी खूप छोटा होतो. लहान मुलगा होतो. तुम्ही जर ४० वर्षांचे असाल आणि २० वर्षाच्या मुलाला वेगळ्या पद्धतीने वागणूक देणार तर कसं होईल?. पूजाने माझ्याबरोबर जे काही केलं ते न सांगण्यासारखं आहे. जे झालं ते खूप क्रुर होतं. एक व्यक्ती व महिला म्हणून मी तिचा खूप आदर करायचो. मला भट्ट साहेबांनी काम करण्याची संधी दिली”.

आणखी वाचा – “खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

“माझ्या पहिल्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. त्यासाठी मी खूप उत्साही होतो. पण एखाद्या लहान मुलाला जर तुम्ही चुकीचा मार्ग दाखवला तर त्याच्याकडून काय अपेक्षा करणार?. ती खूप शिव्या द्यायची. ‘धोखा’नंतर मी ‘राज २’ चित्रपट करावा अशी महेश भट्ट यांची इच्छा होती. त्यांची पत्नी सोनी राजदानलाही माझ्याबरोबर चित्रपट करायचा होता. पण मी खूप घाबरलो होतो. ते माझ्यासाठी वाईट स्वप्नच होतं”.

आणखी वाचा – “कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

View this post on Instagram

A post shared by Muzammil Ibrahim (@muzamilibrahim7)

पूजा देत असलेल्या त्रासाबाबत तू महेश भट्ट, सोनी राजदान यांना कधीच बोलला नाहीस का? असा प्रश्नही मुजम्मिलला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “सोनी राजदान तेव्हा सेटवर नसायच्या. महेश भट्ट सेटवर असायचे. नक्की काय चाललं आहे? हे सगळं महेश यांनी पाहिलं होतं. असं अजिबात करु नकोस म्हणत महेश यांनी पूजाला समज दिला होता. बऱ्याचदा समजावलंही होतं. पण जेव्हा महेश सर सेटवर नसायचे तेव्हा प्रकरण आणखी वाढत गेलं. कलाकारांनी कुत्रा असलं पाहिजे. बस म्हटल्यावर बसलं पाहिजे, असं पूजा सेटवर बोलायची हे मी अनेकांकडून ऐकलं आहे. मी अगदी लहान कुटुंबातून आलेला मुलगा आहे. त्यावेळी मी खूपच घाबरलेला होतो. माझं नुकसान व्हावं, मी पूर्णतः संपून जावं म्हणून माझ्याविरोधात लेखही लिहिले गेले. मला वाईट स्वप्न पडायची. दिवसभर मी फक्त जिवंत राहिन हीच प्रार्थना करत असायचो. मी डिप्रेशनचा बराच सामना केला”. मुजम्मिलने पूजा भट्टचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे.  

Tags: bollywood newsentertainment newsPooja bhatt
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
Anushka Sharma And Virat Kohli

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.