दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. अचानक निधनाची बातमी ऐकून साऱ्यांनी शोककळा व्यक्त केली. मृत्यूच्या वेळी रवींद्र महाजनी हे कुटुंबियांपासून दूर एकटे राहत होते. मृत्यूच्या वेळी ही गोष्ट सर्वांसमोर येताच नेटकऱ्यांनी महाजनी यांच्या पत्नी व मुलाला ट्रोल करु लागले. दरम्यान. यावर गश्मीरने सडेतोड उत्तर देत नेटकऱ्यांची तोंड बंद केली. (ravindra mahajani wife)
यानंतर आता रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या आयुष्यवर आधारित ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रदर्शित केले आहे, यांत त्यांनी बर्याचश्या गोष्टींचा खुलासा केलेला पाहायला मिळत आहे. यांत त्यांनी रवींद्र महाजनी यांचा एक किस्सा सांगितला आहे. यांत त्यांनी लिहिलं आहे की, “रवीला घरी यायला उशीर झाला की, मला भीती वाटायची, मी कपाट उघडून बघायची. एखादा तरी दागिना कमी झालेला असायचा. एकदा असंच जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मला घरात बसणं अशक्य झालं. मी उठले आणि तो जिथे जुगार खेळायला जायचा तिथले अड्डे शोधू लागले. एका जुगाराच्या अड्ड्यावर मला त्याची गाडी दिसली. मी सरळ जिना चढून वर गेले. काचेतून मला तो दिसला”.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “मला पाहताच तो बाहेर आला. हाताला धरून मी त्याला घरी घेऊन आले. पण हे नेहमीच कसं शक्य होणार. मी त्याला थांबवू शकत नव्हते. मला म्हणायचा, ‘मी जेवढे दागिने जुगारात हरलो, ते सगळे मी जुगारातच जिंकून आणेन.’ पण ते कधीच झालं नाही. रवीला जे काही पैसे मिळत ते तो माझ्याकडे द्यायचा. त्याला हवे असले की मागून घ्यायचा. त्याचा हेतू वाईट नव्हता पण पुन्हापुन्हा तो त्याच चुकीच्या मार्गानं पैसे मिळवायला जायचा”, असं त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “पुण्याला आल्यावर वानखेडे स्टेडियमच्या अनुभवावर तेव्हा मला मोठ्या हॉटेलमधे चांगली नोकरी मिळू शकत होती. पण रवीचा स्वभाव संशयी असल्याने मी रात्रीच्या वेळात ड्यूटी करण्याचे टाळले. काही काळ मी नऊ ते पाचवाली नोकरी चांगल्या हॉटेलमधे केली” असंही त्या म्हणाल्या.