दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना १० फेब्रुवारी शनिवारी रोजी सकाळी कोलकाता येथे भरती करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आरोग्यासंबंधित अपडेट रुग्णालयाने अधिकृत निवेदनात सांगितले आहेत. १० फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्तीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (Mithun Chakraborty Health Update)
आता हॉस्पिटलने मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे, कारण त्यांना मेंदूचा इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाल्याचे निदान झाले आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे अनेक चाहते मंडळी प्रार्थना करत आहेत.
मिथुन यांच्या कुटुंबाने नुकतीच ‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखत दिली, यावेळी मदालसा शर्माने मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची चुकीची माहिती सांगितली असल्याचं ती म्हणाली, पुढे ती म्हणाली, “ही फक्त एक नियमित तपासणी होती, या अफवा कोण पसरवत आहे?”. मिथुन चक्रवर्तीचा मोठा मुलगा मिमोह यानेही त्याचे वडील मथून बरे असल्याचे स्पष्ट केले. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “बाबा शंभर टक्के ठीक आहेत. शुगर लेव्हलच्या नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.”
हॉस्पिटलच्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, मिथुन चक्रवर्ती हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. “श्री चक्रवर्ती यांचे न्यूरो-फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टसह डॉक्टरांच्या टीमद्वारे अधिक मूल्यमापन केले जात आहे.”