रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एक एक दागिना कपाटातून गायब व्हायचा आणि…”, रवींद्र महाजनींच्या ‘त्या’ कृत्याबाबत पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाल्या, “जुगाराच्या अड्ड्यावर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 17, 2024 | 7:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ravindra mahajani wife

"एक एक दागिना कपाटातून गायब व्हायचा आणि...", रवींद्र महाजनींच्या 'त्या' कृत्याबाबत पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाल्या, "जुगाराच्या अड्ड्यावर..."

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. अचानक निधनाची बातमी ऐकून साऱ्यांनी शोककळा व्यक्त केली. मृत्यूच्या वेळी रवींद्र महाजनी हे कुटुंबियांपासून दूर एकटे राहत होते. मृत्यूच्या वेळी ही गोष्ट सर्वांसमोर येताच नेटकऱ्यांनी महाजनी यांच्या पत्नी व मुलाला ट्रोल करु लागले. दरम्यान. यावर गश्मीरने सडेतोड उत्तर देत नेटकऱ्यांची तोंड बंद केली. (ravindra mahajani wife)

यानंतर आता रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या आयुष्यवर आधारित ‘चौथा अंक’ हे पुस्तक प्रदर्शित केले आहे, यांत त्यांनी बर्याचश्या गोष्टींचा खुलासा केलेला पाहायला मिळत आहे. यांत त्यांनी रवींद्र महाजनी यांचा एक किस्सा सांगितला आहे. यांत त्यांनी लिहिलं आहे की, “रवीला घरी यायला उशीर झाला की, मला भीती वाटायची, मी कपाट उघडून बघायची. एखादा तरी दागिना कमी झालेला असायचा. एकदा असंच जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मला घरात बसणं अशक्य झालं. मी उठले आणि तो जिथे जुगार खेळायला जायचा तिथले अड्डे शोधू लागले. एका जुगाराच्या अड्ड्यावर मला त्याची गाडी दिसली. मी सरळ जिना चढून वर गेले. काचेतून मला तो दिसला”.

आणखी वाचा – “गोळ्या झाडायच्या, हल्ला करायचा अन्…”, निखिल वागळे हल्ला प्रकरणी मराठी कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “जाहिर निषेध…”

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “मला पाहताच तो बाहेर आला. हाताला धरून मी त्याला घरी घेऊन आले. पण हे नेहमीच कसं शक्य होणार. मी त्याला थांबवू शकत नव्हते. मला म्हणायचा, ‘मी जेवढे दागिने जुगारात हरलो, ते सगळे मी जुगारातच जिंकून आणेन.’ पण ते कधीच झालं नाही. रवीला जे काही पैसे मिळत ते तो माझ्याकडे द्यायचा. त्याला हवे असले की मागून घ्यायचा. त्याचा हेतू वाईट नव्हता पण पुन्हापुन्हा तो त्याच चुकीच्या मार्गानं पैसे मिळवायला जायचा”, असं त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – Video : दारुचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचले, सगळेच एकत्र अन्…; ‘बिग बॉस १७’ची जंगी पार्टी, आतमध्ये नक्की काय काय घडलं?

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “पुण्याला आल्यावर वानखेडे स्टेडियमच्या अनुभवावर तेव्हा मला मोठ्या हॉटेलमधे चांगली नोकरी मिळू शकत होती. पण रवीचा स्वभाव संशयी असल्याने मी रात्रीच्या वेळात ड्यूटी करण्याचे टाळले. काही काळ मी नऊ ते पाचवाली नोकरी चांगल्या हॉटेलमधे केली” असंही त्या म्हणाल्या.

Tags: entertainmentmarathi actorravindra mahajaniravindra mahajani deathravindra mahajani wife
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Mithun Chakraborty Health Update

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार सुरु, ब्रेनस्ट्रोक आला अन् …; तब्येतीबाबत कुटुंबियांचा खुलासा, म्हणाले, "अफवा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.