ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रवास करत असलेल्या गाडीवर काल पुणे येथे हल्ला झाल्याचं समोर आलं. या हल्ल्यातून निखिल वागळे मात्र थोडक्यात बचावले. पुण्यातील दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दलातील सभागृहात वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन कऱण्यात आले होते. त्या सभेला जात असतानाच डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला, गाडीच्या काचा फोडून शाईफेक करण्यात आली. या हल्ल्यानंतर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Nikhil Wagle Case)
सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीही या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणावरुन अभिनेत्री विना जामकर व अभिनेते किरण माने यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. किरण माने हे स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. अभिनयासह ते नेहमीच बऱ्याच ट्रेंडिंग टॉपिकवर आपलं मत मांडताना दिसतात. अशातच आता निखिल वागळे हल्ला या प्रकरणावरही त्यांनी केलेलं भाष्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – “हिला अभिनय जमत नाही”, ‘त्या’ व्यक्तीने तेजश्री प्रधानला हिणावलं, म्हणाला, “पूर्ण कॉपी…”

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वीणा जामकरने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. “सन्माननीय निखिल वागळे, चौधरी सर आणि असीम सरोदे यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध!!” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वीणाच्या या फेसबुक पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत. याशिवाय ‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने यांनी देखील यासंदर्भात पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

किरण माने यांनीदेखील फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “सर्व काही लक्षात राहणार, दिवसा तोंडावर गोड गोड गोष्टी करायच्या. ’एव्हरीथिंग इज वेल’ असं सांगायचं आणि रात्र होताच हक्क मागणाऱ्या लोकांवर लाठीचा वापर करायचा, गोळ्या झाडायच्या. आमच्यावर हल्ला करुन, आम्हाला हल्लेखोर भासवून सर्व काही आमच्या लक्षात राहील! निखिल वागळे यांचा खूप अभिमान व प्रेम – किरण माने” असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे.