शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

देवोलिना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरिकेमध्ये हत्या, आई-वडिलही नाहीत अन्…; भयानक प्रकारानंतर अभिनेत्रीची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे धाव

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 2, 2024 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Devoleena Bhattacharjee social media post

देवोलिना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरिकेमध्ये हत्या, आई-वडिलही नाहीत अन्...; भयानक प्रकारानंतर अभिनेत्रीची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे धाव

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही सतत चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा मित्र शानवाज शेखबरोबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकली. सोशल मीडियावरही ती विविध विषयांवरून ती व्यक्त होत असते. ती ‘बिग बॉस’च्या १३ व्या सीजनमध्येही दिसली होती. पण आता ती तिच्या अभिनयामुळे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. (Devoleena Bhattacharjee social media post)

देवोलीनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या अमेरिकेतील एका मित्राची हत्या झाली असून त्याला न्याय मिळावा अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे. लांबलचक पोस्ट लिहून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री शंकर जयकिशन यांना टॅग करत मदत मागितली आहे. आपल्या मित्राचे पार्थिव मायदेशात आणण्यासाठी अपील केले आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या नावाने पैशांची मागणी, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत सांगितली घटना, म्हणाला, “हा गैरप्रकार…”

My friend #Amarnathghosh was shot & killed in St louis academy neigbourhood, US on tuesday evening.

Only child in the family, mother died 3 years back. Father passed away during his childhood.

Well the reason , accused details everything are not revealed yet or perhaps no one…

— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) March 1, 2024

देवोलीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकॅडमीजवळ माझा मित्र अमरनाथ घोषची गोळी मारून हत्या करण्यात आली.  तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे तीन वर्षापूर्वीच निधन झाले असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले आहे. या प्रकरणातील आरोपीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. त्याच्या कुटुंबातही त्याच्यासाठी लढणारं कोणीच नाही. तो कोलकत्तामधील रहिवासी आहे. तो एक उत्तम डान्सर होता आणि  पीएचडीचे शिक्षण घेत होता. संध्याकाळी बाहेर फिरत असताना अचानक एका अज्ञात व्यतीने त्याच्यावर गोळीबार केला”.

आणखी वाचा – Video : रिहानाला अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आले कोट्यवधी रुपये, घरी परतताना विमानतळावर तिने केलं असं काही की…; घटना कॅमेऱ्यात कैद

पुढे तिने लिहिले आहे की, “ @IndianEmbassyUS ला याबद्दल काहीतरी करण्यासाठी विनंती केली आहे. कमीत कमी त्याच्या हत्येचे कारण तरी समजावे. @DrSJaishankar @narendramodi”.  यावर एका नेटकाऱ्याने उत्तरामध्ये लिहिले आहे की, “त्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आतापर्यंत अधिक माहिती मिळाली नाही”. देवोलीनाच्या पोस्टवर दखल घेतली जाईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काही काळापासून अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील न्यूपोर्ट शहरामध्ये मोटल मलिकची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.  

Tags: americaDevoleena Bhattacharjeenarendra modipm narendra modiShankar jayshankarsocial media post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shivani Surve and Ajinkya Nanavare shared video on the occasion of their 1 month wedding anniversary

Video : घोडेस्वारी, निवांत क्षण अन्...; लग्नाला एक महिना पूर्ण होताच शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.