छोट्या पडदयावरील अनेक कलाकार मंडळींना लगेच प्रसिद्धी मिळते आणि याच प्रसिद्धीमुळे या कलाकारांचे सोशल मीडियावर अनेक फॅन पेजेस कार्यरत असतात. हे फॅन पेजेस आपल्या आवडत्या कलाकाराच्या प्रत्येक गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. मात्र या फॅन पेजेसकडून कलाकाराच्या लोकप्रियतेचा व प्रसिद्धीचा फायदा घेऊन फसवणूकही केली जात असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार अभिनेता अमित भानूशालीबरोबर घडला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून अभिनेता अमित भानुशाली घराघरात लोकप्रिय झाला आहे. या मालिकेमुळे त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली. याआधीही अमितने अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अर्जुन सुभेदार या पात्रामुळे अमितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेता सोशल मीडियावर छानगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
अशातच अमितची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अमितनच्या नावाने इन्स्टाग्रामवर एक फॅन पेज आहे. ‘अमित भानुशाली फॅनक्लब’ असं या फॅन पेजचं नाव आहे. या फॅन पेजने अमित भानुशालीच्या नावाने पैसे मागितले असून यामुळे अनेकांची फसणवुक झाली आहे. या फॅन पेजने सोशल मीडियावर काही लोकांकडून पैसे मागितले असून काही लोक या फसवणुकीला बळीही पडले आहेत.
याबद्दल अमितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना सावध केले आहे. अमितने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मला या डोनेशनबद्दल काहीही माहीत नाही. कृपया कोणी पैसे पाठवू नका. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. माझा या फॅन पेजशी किंवा त्याने केलेल्या या गैरप्रकाराशी काहीही संबंध नाही. त्यामूळे माझी सर्वांना विनंती आहे की, कृपया या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे पैसे पाठवू नका किंवा त्याच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका”.