Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : आता सर्वत्र मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचाच बोलबाला आहे. सध्या दोघांच्याही लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून अनेक दिग्गज उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमासाठी हॉलिवूड पॉपस्टार रिहानाचा परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला. रिहानाच्या एका दिवसाच्या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबानी यांनी तब्बल ५२ कोटी रुपये मोजले आहेत. रिहानाने अनेक गाणी सादर केली. तिच्या गाण्यांना सर्वांनीच आधी पसंती दिली आहे. कार्यक्रम पार पडल्यानंतर रिहाना आपल्या मायदेशी परतली.
गुजरातमधील जामनगर येथे अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. बॉलिवूडसहित हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आहे. यामध्ये पॉपस्टार रिहानाना खास गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. ती भारतात आल्यापासूनच तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यात आता कार्यक्रम संपल्यानंतर मायदेशी जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे.
सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिहाना एअरपोर्टवर महिला पोलिसांबरोबर फोटोसाठी पोज देत आहे. तसेच तिथे असलेल्या फोटोग्राफर्सबरोबरही आदबीने वागत आहे. तिच्या या वर्तवणुकीवरुन सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. जेव्हा ती फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोज देत होती तेव्हा कोणतेही नखरे न करता, व्यवस्थित वेळ देत होती. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही तर आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा चांगली आहे”, दूसरा नेटकरी लिहितो की, “रिहाना खूप चांगली आहे. प्रसिद्ध असली तरीही तिचे पाय जमिनीवर आहेत”,तसेच अजून एक युजर लिहितो की,“ ही किती संस्कारी आहे. डोक्यावर पदरही घेतला आहे”.
सोशल मीडियावर रिहानाच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिने संपूर्ण कपडे घातले होते त्यामुळे तिने भारतीय संस्कृतीचा खूप आदर केला आहे असे म्हंटले गेले. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर ती आपल्या सर्व ग्रुपसह मायदेशी रवाना झाली .