‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही सतत चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा मित्र शानवाज शेखबरोबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकली. सोशल मीडियावरही ती विविध विषयांवरून ती व्यक्त होत असते. ती ‘बिग बॉस’च्या १३ व्या सीजनमध्येही दिसली होती. पण आता ती तिच्या अभिनयामुळे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. (Devoleena Bhattacharjee social media post)
देवोलीनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या अमेरिकेतील एका मित्राची हत्या झाली असून त्याला न्याय मिळावा अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे. लांबलचक पोस्ट लिहून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री शंकर जयकिशन यांना टॅग करत मदत मागितली आहे. आपल्या मित्राचे पार्थिव मायदेशात आणण्यासाठी अपील केले आहे.
My friend #Amarnathghosh was shot & killed in St louis academy neigbourhood, US on tuesday evening.
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) March 1, 2024
Only child in the family, mother died 3 years back. Father passed away during his childhood.
Well the reason , accused details everything are not revealed yet or perhaps no one…
देवोलीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकॅडमीजवळ माझा मित्र अमरनाथ घोषची गोळी मारून हत्या करण्यात आली. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे तीन वर्षापूर्वीच निधन झाले असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाले आहे. या प्रकरणातील आरोपीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. त्याच्या कुटुंबातही त्याच्यासाठी लढणारं कोणीच नाही. तो कोलकत्तामधील रहिवासी आहे. तो एक उत्तम डान्सर होता आणि पीएचडीचे शिक्षण घेत होता. संध्याकाळी बाहेर फिरत असताना अचानक एका अज्ञात व्यतीने त्याच्यावर गोळीबार केला”.
पुढे तिने लिहिले आहे की, “ @IndianEmbassyUS ला याबद्दल काहीतरी करण्यासाठी विनंती केली आहे. कमीत कमी त्याच्या हत्येचे कारण तरी समजावे. @DrSJaishankar @narendramodi”. यावर एका नेटकाऱ्याने उत्तरामध्ये लिहिले आहे की, “त्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आतापर्यंत अधिक माहिती मिळाली नाही”. देवोलीनाच्या पोस्टवर दखल घेतली जाईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काही काळापासून अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या लोकांवर हल्ले झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील न्यूपोर्ट शहरामध्ये मोटल मलिकची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.