सध्या संपूर्ण देशभर आयपीएलचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासूनच हार्दिक पांड्या व रोहित शर्मा यांच्यातील वाद सर्वांसमोर आले होते. प्रेक्षकदेखील हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसले होते. त्यावरून बरीच चर्चा सोशल मीडियावर होत असलेली पहायाला मिळाली. मुंबई इनसीयन्स संघाचा कर्णधार हार्दिकच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. रोहित ला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहत्यांचा रंग अनावर होतानाही दिसून आला. नुकताच १४वा सामना खेळवण्यात आला. हा सामना मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला गेला. या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (pushkar jog on hardik pandya )
हैदराबाद व गुजरात सामन्याच्या ट्रोलिंगनंतर पुन्हा एकदा हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सोमवारी झालेल्या नाणेफेकीदरम्यान घडलेल्या अशाच एका घटनेचा सामना हार्दिकला करावा लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
सामन्याचे समालोचक व माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी नाणेफेकीच्या वेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना पिचवर येण्याचं आव्हान केलं. सामना मुंबईतील स्टेडियमवर होत असल्याने आधी मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला आमंत्रित केले गेले. सर्वात आधी हार्दिकचे नाव घेतले पण प्रेक्षकांमधून त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यात आल्या नाहीत तर त्याच्या विरोधात घोषणा करण्यास सुरुवात केली. पण हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर संजय यांनी प्रेक्षकांना असं करणं चुकीचं असल्याचे सांगितले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने हार्दिकच्या बाजूने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्याने लिहिलं की, “हार्दिकबरोबर जे काही होत आहे ते योग्य नाही. हे आता खूप जास्त होत आहे. हार्दिक हा भारताचे प्रतिनिधीत्त्व करत आहे तसेच त्याने आपल्या देशासाठी अनेक सामनेही जिंकून दिले आहेत. रोहितचे चाहते असणे चांगली गोष्ट आहे. मात्र कोणत्याही भारतीय खेळाडूला ही वागणूक मिळणे चुकीचं आहे. हार्दिकने जे केलं ते पूर्ण योग्य नसेल. पण त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा अपमान करणे चुकीचं आहे”.
हार्दिकला मिळालेल्या वागणुकीबद्दल सर्वच स्तरातून लोक व्यक्त होत आहेत. अनेक सेलेब्रिटी व खेळाडूंनी हार्दिकला पाठिंबा दिला आहे.