रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धार्थ बोडके व तितीक्षा तावडे यांनी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या हॉटेलमध्ये जेवणावर मारला ताव, उखाणाही घेतला अन्…; म्हणाला, “खूप भूक लागली म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 2, 2024 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Bodke and Titeeksha Tawde had lunch at Anagha Atul's hotel and took special ukhana

सिद्धार्थ बोडके व तितीक्षा तावडे यांनी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या हॉटेलमध्ये जेवणावर मारला ताव, उखाणाही घेतला अन्...; म्हणाला, "खूप भूक लागली म्हणून..."

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी अभिनयाव्यतिरिक्त उद्योग क्षेत्रातही आपलं नवीन पाऊल टाकलं आहे. आशातच दिवसांपूर्वी ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनघाने नवीन हॉटेल सुरू करणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. तिच्या या नवीन हॉटेलच्या व्यवसायानिमित्त तिला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच लोकप्रिय मराठी जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनीही अनघाच्या ‘वदनी कवळ’ या नवीन हॉटेलला भेट दिली.

तितीक्षा-सिद्धार्थ हे पुण्यात नाटक बघायला गेले असताना नाटकानंतर या दोघांनी अनघा या त्यांच्या मैत्रिणीच्या हॉटेलला भेट दिली. तितीक्षाने आपल्या युट्यूब चॅनेलद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा-सिद्धार्थ यांनी अनघाच्या हॉटेलमधील जेवणाचा छान आस्वाद घेतला. यावेळी अनघाने तिच्या हॉटेलमध्ये तितीक्षा-सिद्धार्थ यांनी स्वागत करण्याआधी त्यांना उखाणा घेण्याची अट घातली. तेव्हा सिद्धार्थने त्याच्या खास शैलीत एक उखाणा ही घेतला. त्याच्या या खास उखाण्याची झलकही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – “भाऊ वडिलांना अग्नी देत होता आणि…”, प्रसाद ओकने सांगितली ती दुःखद घटना, म्हणाला, “त्यांना शेवटचं पाहताही आलं नाही कारण…”

यावेळी सिद्धार्थने उखाणा घेत असं म्हटलं की, “खूप भूक लागली म्हणून आलो बालगंधर्वजवळ, कुठे जायचं  म्हणून काय विचारता?, आहे ना आपलं वदनी कवळ” असा खास उखाणा घेत तितीक्षा-सिद्धार्थ यांनी अनघाच्या या हॉटेलमध्ये प्रवेश केला. यानंतर या दोघांनी हॉटेलमधील स्वादिष्ट व रुचकर पदार्थांचा आस्वादही घेतला. जेवण झाल्यानंतर तितीक्षा-सिद्धार्थ यांनी आमरासवरदेखील खूप ताव मारला. यानंतर या दोघांनी आपल्या मैत्रिणीच्या हॉटेलचे तोंडभरुन कौतुकही केले.

आणखी वाचा – “मास्तरीण बाई या शब्दावर फक्त माझा हक्क”, अक्षराने अधिपतीला दिली सक्त ताकीद, नवीन शिक्षिका ठरणार का दोघांमधील वादाचं कारण?

दरम्यान, अभिनेत्री अनघा अतुल ही अभिनयक्षेत्राबरोबरच हॉटेलच्या व्यवसायात आल्यामुळे तिचे अनेक चाहत्यांसह कलाकारांनीही कौतुक केले होते. त्यामुळे आता ही अभिनेत्री पुन्हा पडद्यावर कधी पहायला मिळणार यासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक आहेत आणि तितीक्षा-सिद्धार्थ यांच्याबद्दल बोलायचे झाले तर तितीक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, तर सिद्धार्थ लवकरच त्याच्या ‘जेएनयू’ या हिंदी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.          

Tags: siddharth bodketiteeksha tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Prasad Khandekar Appreciate Namrata Sambherao

मैत्रिणीचं यश पाहून प्रसाद खांडेकरने कौतुक करत लिहिलं पत्र, नम्रता संभेरावला म्हणाला, "तुझ्या कामावर विश्वास होता म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.