‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मोहिना कुमारी. या मालिकेतून अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीने आता तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. मोहिनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून यावेळी तिच्या घरात लक्ष्मी आली आहे. मोहिना आता एका मुलीची आई झाली आहे. तिने २०१९ मध्ये सुयश रावतशी लग्न केले आणि लग्नाच्या तीन वर्षांनंतर तिने अयांशला जन्म दिला. (Mohena Kumari Blessed With Baby Girl)
मोहिनाने ‘नया अकबर बिरबल’, ‘कुबूल है’, ‘सिलसिला प्यार का’ आणि ‘प्यार तूने क्या किया’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले असले तरी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील ‘कीर्ती गोएंका सिंघानिया’मुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. मोहिना कुमारी सिंगच्या फॅन पेजवरुन अभिनेत्री आई झाली असल्याची गोड बातमी समोर आली.अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून यावेळी ती एका मुलीची आई झाली आहे.
आई व मुलगी या दोघींनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, कुटुंबीयांनी त्यांचे घरी जंगी स्वागत केले. ज्यामध्ये मोहिनाचा पती सुयशने त्यांचा मुलगा अयांशला उचलून घेतलेले दिसत आहे आणि अयांशची त्याच्या लहान बहिणीशी ओळख करुन देताना ते दिसत आहेत. अयांश त्याच्या लाडक्या बहिणीकडे खूप प्रेमाने बघताना दिसला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही उपस्थित असलेले पहायला मिळाले.
मोहिनाने लग्नानंतर सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. मोहिना अभिनेत्री असण्याबरोबरचं उत्तम नृत्यांगना म्हणून लोकप्रिय आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्याबरोबरही तिने काम केले आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने आपला सगळा वेळ कुटुंबासाठी दिला. लग्नानंतर तिने तीन वर्षांनी एका मुलाला जन्म दिला. आणि त्यानंतर आता तिने एका मुलीला जन्म देत गुडन्यूज दिली.