बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भारत दौर यावेळी चांगलाच चर्चेत राहिलं. ती अनेक कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. नुकताच तिने तिच्या घरच्या बाल्कनीमधील एक फुलांनी सजलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे तिच्या घरी काहीतरी मोठा कार्यक्रम होणार असल्याचे अंदाज वर्तवले गेले. त्याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. तिच्या घरातील कार्यक्रम होण्यामागील कारण आता समोर आले असून प्रियांकाच्या भावाचे लग्न होणार आहे. (priyanka chopra brother wedding)
प्रियाका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचा रोका निलम उपाध्याय बरोबर झाला असून फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ व निलम यांच्या रोका सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
याआधी सिद्धार्थचे लग्न इशिता कुमार बरोबर ठरले होते. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच त्यांचे लग्न मोडले. २०२० साली देखील प्रियंका आपल्या भावाच्या लग्नासाठी भारतात आली होती. पण तेव्हा लग्न पुढे ढकलले गेल्याने ती पुन्हा परत गेली होती. त्यावेळी इशितावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण नंतर मात्र दोघांनीही आपले सोशल मीडियावरील सर्व फोटो डिलिट केले होते.
आता सिद्धार्थने त्यांची मैत्रिण निलमबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा रोका पार पडला असून लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. निलम ही दाक्षिणात्य चित्रपटातील एक लोकप्रिय अभिनेत्री आशे. तिने २०१२ साली तेलुगू चित्रपट ‘मिस्टर ७’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रातून पदार्पण केले होते. तसेच तमिळ भाषेतील काही चित्रपटांमध्येही अनेक भूमिका केल्या आहेत.
दरम्यान प्रियांका चोप्राच्या घरात लग्नसराईचा काळ सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच तिची बहीण मीराचे लग्नदेखील थाटामाटात पार पडले होते. पण तेव्हा काही कारणामुळे प्रियांका लग्नासाठी अनुपस्थित असलेली दिसली. तिचा यावेळचा आयोध्या दौरादेखील चांगलाच चर्चेत राहिला. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर कतरिना कैफ व आलिया भट्टदेखील दिसणार आहेत.