शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही तरी…”, शाहीर साबळेंसाठी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले, “आयुष्यभर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 3, 2023 | 10:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kedar shinde grandson of shahir sable

“शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही तरी...”, शाहीर साबळेंसाठी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले, “आयुष्यभर...”

मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे केदार शिंदे. अलिकडेच त्यांचा प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. केदार यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. दरम्यान त्यांनी त्यांचे आजोबा म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही तयार केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यांनी हा चित्रपट बनवण्याचं शिव धनुष्य यशस्वीरित्या पेललं. आता याचनिमित्त केदार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

शाहीर साबळे यांचा आज जन्मदिवस आहे. याचनिमित्त केदार यांनी त्यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाहीर साबळे यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं असल्याचंही त्यांनी नमुद केलं. ते म्हणाले, “बाबा… शाहीर साबळे. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९ मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पुर्ण झालं”.

आणखी वाचा – लेकीच्या घटस्फोटासाठी नीना गुप्ता स्वतः जबाबदार, मसाबा गुप्ताचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आईला…”

“तुमच्या आयुष्याचं documentation झालं. @amazonprime ला आज “महाराष्ट्र शाहीर” सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून राहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातु म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे”.

आणखी वाचा – दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ची आठ दिवसांमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई, पण चित्रपट बनवण्यासाठी नेमका किती खर्च लागला?

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

पुढे ते म्हणाले, “माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खूप झालं”. केदार शिंदेंच्या या पोस्टचं नेटकरी कौतुक करत आहेत.

Tags: entertainment newskedar shindemarathi actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
amruta deshmukh and prasad jawade

Video : “नाटकांच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण...”, अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा, आजोबांनी नातीचं केलं थाटात केळवण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.