मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे केदार शिंदे. अलिकडेच त्यांचा प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. केदार यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. दरम्यान त्यांनी त्यांचे आजोबा म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही तयार केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यांनी हा चित्रपट बनवण्याचं शिव धनुष्य यशस्वीरित्या पेललं. आता याचनिमित्त केदार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
शाहीर साबळे यांचा आज जन्मदिवस आहे. याचनिमित्त केदार यांनी त्यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाहीर साबळे यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं असल्याचंही त्यांनी नमुद केलं. ते म्हणाले, “बाबा… शाहीर साबळे. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९ मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पुर्ण झालं”.
आणखी वाचा – लेकीच्या घटस्फोटासाठी नीना गुप्ता स्वतः जबाबदार, मसाबा गुप्ताचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आईला…”
“तुमच्या आयुष्याचं documentation झालं. @amazonprime ला आज “महाराष्ट्र शाहीर” सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून राहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातु म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे”.
पुढे ते म्हणाले, “माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खूप झालं”. केदार शिंदेंच्या या पोस्टचं नेटकरी कौतुक करत आहेत.