बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ची आठ दिवसांमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई, पण चित्रपट बनवण्यासाठी नेमका किती खर्च लागला?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 2, 2023 | 5:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Subhedar Movie Budget

दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार'ची आठ दिवसांमध्येच कोट्यवधी रुपयांची कमाई, पण चित्रपट बनवण्यासाठी नेमका किती खर्च लागला?

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यांसारखे दर्जेदार ऐतिहासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ नुकताच राज्यासह देश-विदेशात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून शिवप्रेमी व रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील थरारक सीन्स, गाणी प्रचंड गाजत आहे. शिवाय, कलाकारांचा अभिनय व उत्तम दिग्दर्शन यांमुळे सिनेरसिक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहे. (Subhedar Movie Budget)

प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, त्या दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पूर्ण केल्या आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ८.७४ कोटींची कमाई केली असून तो लवकरच १० कोटींचा आकडा गाठणार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे, बॉलिवूडचे अनेक बिगबजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असताना ‘सुभेदार’ चित्रपटही चांगला जम बसवत आहे. मात्र, जर ‘सुभेदार’वेळी बॉलिवूडचा अन्य चित्रपट नसता, तर कदाचित कमाईचे हे आकडे चांगले असते. (Subhedar Movie Budget)

हे देखील वाचा – “पैसे नाहीत त्याला…”, मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने लाखो रुपये थकवल्यामुळे शशांक केतकर भडकला, म्हणाला, “इंडस्ट्रीमधील मोठी नावं…”

View this post on Instagram

A post shared by #Subhedar | #सुभेदार ???????????????????????????????? ???????????????? (@subhedarthefilm)

सिंहगड किल्ल्याची लढाई व सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट १० कोटींमध्ये बनला गेला आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केल्याने दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करेल, यात शंका नाही.

हे देखील वाचा – मोठा पडदा गाजवल्यानंतर रजनीकांतचा ‘जेलर’ येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर, कधी व कुठे पाहता येणार चित्रपट?

या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त यांसारखे अनेक दिग्ग्ज कलाकार झळकले आहे.

Tags: marathi moviesubhedar movieSubhedar Movie Budget
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
kedar shinde grandson of shahir sable

“शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही तरी...”, शाहीर साबळेंसाठी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले, “आयुष्यभर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.