Maharashtra Bhushan Award : मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. गेली पाच दशके त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेविश्वातही त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानिमित त्यांचे अभिनंदनही केले.
आणखी वाचा – पुलकित-क्रिती लवकरच अडकणार लग्नबंधनात, साखपुड्याचे फोटो आले समोर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे कौतुक करत असे म्हटले की, “अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे. “
आणखी वाचा – बालीमध्ये हनिमून, मॅचिंग टॅटू, अन्…; आयरा-नूपुरची लग्नानंतरची पहिली ट्रीप, फोटो तुफान व्हायरल
दरम्यान, अशोक सराफ यांनी त्यांना हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त आनंदाची व अभिमानाची भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांना हा पुरस्कार जाहीर होताच चाहत्यांस मनोरंजन विश्वातून अनेक कलाकार मंडळींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.