मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्यमुळे पारूची वैजू भेटली, दामिनीचा डाव तिच्यावरच उलटला अन्…; अहिल्यादेवींसमोर येणार का वैजूचं सत्य?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

आदित्यमुळे पारूची वैजू भेटली, दामिनीचा डाव तिच्यावरच उलटला अन्…; अहिल्यादेवींसमोर येणार का वैजूचं सत्य?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू आणि वैजूची ताटातून झालेली असते. वैजूला दिशा व दामिनीने लपवून नेलेलं असतं आणि तिला एका मटण विक्रेत्याला विकलेलं असतं. वरून तोंड बंद करण्यासाठी दिशाने त्याला पैसेही दिलेले असतात. तर बंगल्यात कुठेच वैजू सापडत नाही हे समजतात पारू आदित्य व प्रीतमला घेऊन बंगल्या बाहेर शोधायला जाते. तितक्यात मारुती व सावित्री यांना बंगल्याबाहेरचा सुरक्षा रक्षक येऊन दामिनी मॅडमने वैजूला एका मटन विक्रेत्याला विकले असल्याचं सांगतो. हे ऐकून मारुती व सावित्री यांच्या पायाखालची जमीन सरकते. (Paaru Serial Update)

तर इकडे पारू, आदित्य, प्रीतम वैजूला शोधायला बाहेर पडलेले असतात मात्र पारू काही तिचा फोन घेऊन जात नाही. सावित्री तिला फोन लावण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा फोन ती उचलत नाही तेव्हा लक्षात येते की पारूने मोबाईल घरीच ठेवला आहे. त्यानंतर ती प्रीतमला फोन लावते तेव्हा पारू तिच्याशी बोलते तेव्हा कळतं की एका मटण विक्रेत्याला दामिनीने तिच्या वैजूला विकलेल आहे. हे सगळं कळल्यावर पारूच्याही पायाखालची जमीन सरकते. पारू आदित्य व प्रीतमला ही गोष्ट सांगते त्यानंतर ते एका मटण विक्रेत्याच्या दुकानासमोर येतात तर तो मटण विक्रेता वैजूला मारणार इतक्यात आदित्य वैजूला उचलून घेतो आणि सांगतो की, ही आमची वैजू आहे. त्याच्यामुळे तुम्ही हिला मारू शकत नाही.

आणखी वाचा – राहा कपूर काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसली अन्…; रणबीर-आलियाच्या मुलीचे Cute Expression पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यानंतर पारू वैजूला जवळ घेते आणि ढसाढसा रडू लागते आणि सांगते की हे अजूनही छोटसं बाळ आहे. तुम्ही हिला कसं मारू शकता यावर मटन विक्रेता सांगतो की, आमचा हा धंदाच आहे आम्हाला हे करावंच लागेल आणि ती माझी आहे त्याच्यामुळे तिचं काय करायचे ते मला मला ठरवू द्या. तुम्ही तिला माझ्याकडे द्या हे ऐकल्यावर पारू नकार देते. त्यानंतर आदित्य म्हणतो की ती आमची पाळीव बकरी आहे हे ऐकल्यावर मटन विक्रेता म्हणतो की, मी तिला विकत आणलं आहे. त्यानंतर आदित्य सांगतो की तिला चोरून तुमच्याकडे आणून दिलं. तुम्ही सांगाल ती किंमत या बदल्यात द्यायला मी तयार आहे. तेव्हा मटण विक्रेता पाच हजार रुपये किंमत सांगतो आणि आदित्यकडून पाच हजार रुपये घेतो. घरी आल्यानंतर इकडे दामिनी मटन विक्रेत्याने दिलेलं मटन घेऊन पारूजवळ येते आणि सांगते की हे मटन घे आणि शिजवून खा. तुझी ती बकरी आता पुन्हा काही यायची नाही. हे ऐकल्यावर पारू शांतच बसते तर गणी जोरजोरात रडू लागतो. तेव्हा दामिनी मारुतीला सांगते की तुमच्या वैजूला मीच गायब केलं आहे, आता ती पुन्हा काही तुम्हाला मिळायची नाही. तितक्यात तिथं आदित्य व प्रीतम येतात आणि आदित्य वैजूला गणीकडे देतो. हे पाहून दामिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उतरतो. दामिनी म्हणते की, ही बकरी तुमच्याकडे कशी आली मग मटन विक्रेत्याने मला काय दिला आणि पिशवीत हात घालून बघते तर तिच्या हाताला शेण लागत.

आणखी वाचा – नव्या नवरीच्या मनात गैरसमज निर्माण करतेय संजना, आरोहीसमोरच अरुंधतीने घेतली शाळा, असुरी आनंद मोडून काढला अन्…

तेव्हा प्रीतम दामिनीची चांगलीच कानउघडणी करतो तर आदित्य ही दामिनीला चांगलं सुनावतो. तर इकडे दामिनी त्यांना धमकावते की, आता ही गोष्ट जेव्हा वहिनींना कळेल तेव्हा वहिनी काय करतात ते बघू असं म्हणून तिथून निघून जाते, आता अहिल्यादेवी ना वैजूचं सत्य कळणार का?, अहिल्यादेवी यावर काय निर्णय घेणार?, खोटं बोलल्याप्रमाणे पारूला शिक्षा होणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatepaaru serial zee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

चैतन्यने पुन्हा केला अर्जुनचा विश्वासघात, तर प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणलं, सायलीने प्रेमाची कबुली देत डाव पलटला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.