गेल्या वर्षात बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान व नूपुर शिखरे यांची जोरदार चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले. आयरा-नूपुर यांचा मनोरंजन सृष्टीशी थेट संबंध नसला तरी दोघे त्यांच्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आले. मुंबईमध्यए नोंदणी पद्धतीने लग्न पार पडल्यानंतर उदयपुरमध्येही दोघांनी शाही पद्धतीने एकमेकांशी विवाह केला.
आमिर खाननं १३ जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केलं होतं. त्यानंतर आयरा-नुपूर त्यांच्या हनीमूनसाठी बालीला गेले आहेत. आयराने नुकतेच बालीमधील काही फोटो शेअर केले आहेत. लवकरच ते तिथून परत येणार आहे. पण येताना तिथली एक खास आठवण आयरा व नुपूर घेऊन येत आहेत.
आयरा व नुपूरने यांनी बालीमध्ये एकमेकांसारखे टॅटू काढले आहेत. आयराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या टॅटूची एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात आयराने तिच्या खांद्यावर कासवाच्या जोडीचा टॅटू काढला आहे. या टॅटूसह तिने “हा टॅटू खरचं खूप छान आहे, त्यामुळे या टॅटूला मी आता दिवसभर न्याहाळणार आहे.” आयराने तिच्या मानेखाली खांद्याजवळ दोन कासवांचे टॅटू काढले आहेत.
तसेच नूपुरनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे टॅटूचा फोटो शेअर केला आहे. यात नूपुरने त्याच्या दंडावर व हातावर टॅटू काढला आहे. नूपुरने त्याच्या दंडावर व हातावर कासवाचा टॅटू काढला असून “या बेटावरील काही वस्तू घेऊन जात आहे” असं म्हटलं आहे. तसेच त्याने टॅटू काढणाऱ्याला धन्यवाद म्हटले आहे.