शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासरी हसतहसत गेली ‘पारू’ फेम शरयू सोनावणे, आईला मिठी मारत आनंदात दिसली अन्…, न रडलेल्या नवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2024 | 2:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sharayu sonavane wedding moment

सासरी हसतहसत गेली 'पारू' फेम शरयू सोनावणे, आईला मिठी मारत आनंदात दिसली अन्…, न रडलेल्या नवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. या मालिकेच्या कथानकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. पारूचा मालिकेतील संघर्षमय असा प्रवास प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. तर पारू या भूमिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणेवर ही प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. शरयूने अगदी हुबेहूब अशी पारूची भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याआधी शरयूने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (Sharayu Sonavane Wedding Moment)

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी या पात्रामुळे शरयू घराघरात पोहोचली. मात्र सध्या शरयू पारू या भूमिकेमुळे चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच शरयू आणखी एका गोष्टीमुळे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमुळे सध्या ती चर्चेत आली आहे. ही पोस्ट शरयूने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी शेअर केली आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच पारुने तिचं लग्न जाहीर केले आहे. काही वर्षांपूर्वी पारूने निर्माता जयंत लादेसह साखरपुडा समारंभ उरकत त्याचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी केव्हा लग्न केलं हे कळलच नाही. थेट लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी लग्नसमारंभातील काही खास क्षण शेअर करत तिने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली.

आणखी वाचा – अभिनेते, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

View this post on Instagram

A post shared by Asha Shende (@shende.asha_official)

शरयू व जयंतच्या लग्नाचे फोटो पाहून चाहते ही खूप खुश असल्याच पाहायला मिळाले. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सही केलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच शरयूच्या आईने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये शरयू सासरी जाताना तिच्या आईचा, भावाचा आजीचा निरोप घेताना दिसत आहे. मात्र निरोप घेताना शरयू खूपच आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. न रडणारी नवरी असं कॅप्शन देत हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शरयू लग्नासाठी खूपच आनंदी असल्याच पाहायला मिळालं. शरयूच्या लग्न सोहळ्यातील फोटो समोर येताच तिच्या लग्नातील शाही लूकची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – अयोध्येत पोहोचलं ओक कुटुंब, प्रसादने पत्नी, मुलांसह रामलल्लाचं घेतलं दर्शन, मराठमोळ्या पेहरावातील फोटोही केले शेअर

विधीसाठी खास लाल रंगाची पैठणी साडीची नऊवारी तिने नेसली होती. तर रिसेप्शन लूकसाठी शरयूने पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी परिधान केली होती. यावेळी अभिनेत्री आलिया भटच्या लग्नातील तिच्या लूक सारखाच लूक केला असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. शरयू व जयंतच्या या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

Tags: marathi actresspaaru fame sharayu sonavane weddingsharayu sonavane weddingSharayu Sonavane Wedding Moment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Aai Kuthe Kay karte Promo

नव्या नवरीच्या मनात गैरसमज निर्माण करतेय संजना, आरोहीसमोरच अरुंधतीने घेतली शाळा, असुरी आनंद मोडून काढला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.