बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चित्रपटासमोर सगळं क्षुल्लक…”, ‘अ‍ॅनिमल’मधून परिणीती चोप्राच्या हकालपट्टीवर संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा, म्हणाले “काही पात्र कलाकारांना शोभत…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2023 | 5:49 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
director sandeep reddy vanga talked about actress parineeti chopras exit from animal movie

"चित्रपटासमोर सगळं क्षुल्लक…", 'अ‍ॅनिमल'मधून परिणीती चोप्राच्या हकालपट्टीवर संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा, म्हणाले "काही पात्र कलाकारांना शोभत…"

रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच या चित्रपटाने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. तर या चित्रपटातील रणबीर कपूर, बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. त्याचबरोबर रणबीरबरोबर मुख्य भूमिका साकारणारी रश्मिका मंदाणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Sandeep Reddy Vanga On Animal)

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रश्मिकाऐवजी अभिनेत्री परिणीती चोप्राची ‘गीतांजली’च्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. परंतु, नंतर काही कारणास्तव परिणीतीला चित्रपटातून संदीप यांनी हाकलून दिल्याची बातमी समोर आली. यावर स्वतः संदीप रेड्डी वांगा यांनी खुलासा केला आहे. चित्रपटातली गीतांजली या भूमिकेसाठी परिणीती योग्य नसल्याने तिला काढण्यात आला आणि यामुळे ती नाराजही झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोमल नहाटा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यावर भाष्य केले आहे.

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

आणखी वाचा – अरबाजच्या खानच्या ‘त्या’ कृतीने दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना मिळाला पूर्णविराम, अभिनेत्यानेच केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

यावेळी मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की, “मी तिला (परिणीती) सांगितलं की, जमलं तर मला माफ कर. खरंतर ही माझीच चूक होती. काही पात्रं ही काही कलाकारांना शोभत नाहीत. माझा ऑडिशनवर विश्वास नाही, माझं मन जे सांगेल, त्यानुसार मी काम करतो. अगदी आधीपासूनच मला परिणीतीचं काम प्रचंड आवडतं, मला तिला ‘कबीर सिंग’मध्येही घ्यायचं होतं. पण तेव्हादेखील ते शक्य झालं नाही. मला तिच्याबरोबर काम करायची प्रचंड इच्छा आहे आणि तिलाही ते माहीत आहे.”

आणखी वाचा – ‘गुलाबाची कळी हळदीने माखली!’ गौतमीला लागली स्वानंदच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

यापुढे ते असं म्हणाले की, “माझ्यासाठी चित्रपटासमोर सगळं काही क्षुल्लक आहे. यावरून मी तिची माफीही मागितली. मी त्यावेळी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतल्याचं तिला स्पष्ट केलं होतं. तिला या गोष्टीचं वाईट वाटलं होतं, पण मी हे असं का करतो हे तिलादेखील चांगलंच ठाऊक होतं.” दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून फक्त भारतात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.

Tags: animalanimal moviebollywood newsentertainment newsParineeti ChopraSandeep Reddy Vanga
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
ARBAAZ KHAN WEDDING

Video : अरबाज खानसह शौरा खान अडकणार लग्नबंधनात, मुलगा अरहानसह संपूर्ण खान कुटुंब अर्पिताच्या घरी रवाना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.