बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी त्याच्या नवीन लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली होती. अरबाजच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मलायका अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रीयानीबरोबर रिलेशनमध्ये होता. पण त्यांच्यातही काही कारणांमुळे ब्रेकअप झाला आणि अशातच आता तो तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अरबाज २४ डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगताना पाहायला मिळत आहे. (Arbaaz Khan Video Viral On Instagram)
अरबाजने काल (२३ डिसेंबर) रोजी मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमानिमित्त खास हजेरी लावली होती. यावेळी पापाराझींनी अरबाजला त्याच्या लग्नाबद्दल विचारले. तेव्हा अरबाज लाजेने लालबुंद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्याने पापाराझींच्या प्रश्नाला उत्तर देणेही टाळले. त्याने उत्तर देणे टाळत आपल्या ओठांवर बोट ठेवले आणि लग्नाबद्दल आणखी प्रश्न विचारू नका अशी विनंतीही केली. तथापि, त्याने त्याच्या लग्नाबद्दल चालू असलेल्या वृत्तांवर काही भाष्यही केले नाही. त्यामुळे अभिनेत्याच्या लग्नाचे वृत्त खरे आहे की काय अशा चर्चांना आता आणखी उधाण आले आहे.
आणखी वाचा – ‘गुलाबाची कळी हळदीने माखली!’ गौतमीला लागली स्वानंदच्या नावाची हळद, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
काही दिवसांपूर्वी ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात, त्यांनी अरबाजच्या आगामी लग्नाविषयी खुलासा केला होता. ज्यामध्ये असे म्ह्टले होते की, अरबाजचे आगामी लग्न येत्या २४ डिसेंबर रोजी होणार आहे आणि या लग्नाला त्याच्या जवळचे काही मोजकेच कुटुंबिय व मित्रपरिवार उपस्थित असेल. तसेच अरबाजने त्याच्या ‘पटना शुक्ला’ या नवीन चित्रपटाच्या सेटवर शुराची भेट घेतली असल्याचेदेखील यात म्हटले होते.
अरबाजने १९९८ मध्ये मलायकाबरोबर लग्नगाठ बांधली होती. पण लग्नानंतर १९ वर्षांनी त्यांच्यात घटस्फोट झाला. मग अरबाज जॉर्जियाबरोबर रिलेशनमध्ये होता. मात्र तिच्याबरोबरही त्याचा ब्रेकअप झाला आणि आता तो शुराबरोबर लग्न करणार असल्याचे हटले जात आहे. दरम्यान, शूरा ही बॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहे.