सलमान खानचा भाऊ व प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक अरबाज खान दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आज अरबाज खान त्याची गर्लफ्रेंड शौरा खानसह लग्न करत असल्याचं समोर आलं आहे. अरबाज व शौराचे लग्न अभिनेत्याची बहीण अर्पिताच्या घरी होत असल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण खान कुटुंब तसेच अरबाजचा मुलगा अरहानही अर्पिताच्या घरी पोहोचला आहे. (Arbaaz Khan Wedding)
अरबाज खानच लग्न हा एक अतिशय खासगी सोहळा आहे. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य व जवळचा मित्र परिवार उपस्थित असणार आहे. ५६ वर्षीय अरबाजच्या लग्नाला वडील सलीम खान, आई सलमा यांनी नुकतीच हजेरी लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. लग्नासह अर्पिता खान शर्माच्या घरी सर्व विधीही पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.
अरबाज खानच्या लग्नाला अभिनेत्री रिद्धिमा पंडितचीही उपस्थिती पाहायला मिळाली. अरबाजच्या लग्नात सोहेल खान व त्याचा मुलगा निर्वाण देखील उपस्थित असल्याचं समोर आलं. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या लग्न सोहळ्याला सलमान खानची जवळची मैत्रीण युलिया वंतूर हिने देखील हजेरी लावली होती. अरबाज खानने यापूर्वी मलायका अरोरासह १९९८ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना अरहाण झाला. अरबाज व मलायकाच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते, पण हळूहळू त्यांच्यात मतभेद सुरु झाले. आणि त्यानंतर २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
मलायकापासून वेगळे झाल्यानंतर काही वर्षांनी अरबाजने मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करायला सुरुवात केली. त्यांच्याही लग्नाच्या बातम्या आल्या, पण दीड वर्षापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. जॉर्जियापासून वेगळे झाल्यानंतर शौरा खानने अरबाजच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आता त्याने तिला जीवनसाथी बनवले आहे. अरबाज खान व शौरा खानची भेट त्याच्या ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शौरा खान व्यवसायाने बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आहे. तिने अनेक सेलिब्रिटींना स्टाइल केले आहे.