Puja Banerjee pregnant : प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री पूजा बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम पूजा बॅनर्जीने अलीकडेच तिच्या व्लॉगमध्ये खुलासा केला आहे की ती तिचा पती कुणाल वर्मासोबत तिच्या दुसऱ्या मुलाची अपेक्षा करत आहे. पूजा आणि कुणालला आधीच एक मुलगा आहे. ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि यावेळी खूप आनंदी आहेत. अलीकडेच, अभिनेत्रीने यूट्यूबवर ‘सरप्राईज’ नावाचा एक व्लॉग शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या चाहत्यांना सांगितले की ती तिच्या दुस-या मुलाची अपेक्षा करत आहे. सकाळी, तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील शेअर केला, ज्यामध्ये तिने गर्भधारणेच्या समस्या आणि त्यांचे निराकरण याबद्दल सांगितले.
एका छोट्या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये पूजाने तिची प्रेग्नेंसी किट दाखवून अधिकृत घोषणा केली. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने तिचा क्यूट बेबी बंपही दाखवला. यानंतर पूजाने तिच्या गरोदरपणात होणाऱ्या मूड स्विंगबद्दल सांगितले. पण तिच्याकडे एक उपाय आहे, आणि तो म्हणजे तिच्या पहिल्या मुलाबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी.
आणखी वाचा – “सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL
पूजा बॅनर्जी वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून गेली. पूजा बॅनर्जीने 2004 साली तिचा प्रियकर अरुणॉय चक्रवर्तीसोबत लग्न केले. लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. नंतर 2013 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आपल्या पहिल्या लग्नाच्या ब्रेकअपचे दु:ख विसरून पूजा बॅनर्जीने तिच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आणि ‘देवों के देव महादेव’मध्ये देवी पार्वतीची भूमिका साकारली. या भूमिकेने पूजा बॅनर्जीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
आणखी वाचा – “आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….
नंतर पूजा बॅनर्जी टीव्ही अभिनेता कुणाल वर्माला भेटली. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०२१ मध्ये गोव्यात लग्न केले. पूजा बॅनर्जी २०२० मध्ये आई झाली होती. त्यानंतर कोर्ट मॅरेजही झाले. हे टीव्ही कलाकार कृशिव वर्मा नावाच्या मुलाचे पालक आहेत.





