सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
veen doghatli hi tutena serial

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

veen doghatli hi tutena serial : ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत येत्या आठवड्यात प्रेक्षकांना रोमँटिक क्षण आणि मनोरंजक वळणांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील तणाव, गैरसमज आणि नात्यांच्या गुंतागुंती मधून कथा पुढे सरकत असताना, एक विशेष ट्रॅक येणार आहे. स्वानंदी आणि समर आश्रमात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करतात. अनेक अडचणी, अडथळे आणि विरोध असूनही, ते हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करतात. काही लोक या उपक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु समर ठामपणे उभा राहून सर्व परिस्थिती हाताळतो.या उपक्रमादरम्यान स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं अधिक घट्ट होताना दिसणार आहे.

वृक्षारोपणाच्या या सुंदर वातावरणात, दोघांमध्ये जवळीक वाढणार असून एका रोमँटिक गाण्यावर त्यांच्यातील सुंदर क्षण पाहायला मिळणार आहे. या सगळ्याबद्दल बोलताना स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधान म्हणाली, “या गाण्याच्या शूटसाठी मी आमच्या प्रोडक्शनला पूर्ण क्रेडिट देईन. कारण मी नेहमीच उन्हाळ्यात आउटडोअर शूट टाळण्याबाबत आग्रही असते. एवढ्या उष्णतेत काम करणं कठीण वाटतं, त्यामुळे गरज नसेल तर टाळावं असंच माझं मत असतं आणि हे फक्त आमच्या शोसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच आहे. पण काही सीन खऱ्या वातावरणातच चांगले दिसतात. मला आमच्या प्रोडक्शनचं कौतुक वाटतं की त्यांनी भरपूर सावली आणि झाडं असलेलं लोकेशन निवडलं आणि आमची खूप काळजी घेतली”.

आणखी वाचा – घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुढे ती म्हणाली, “आम्ही ठाण्यात शूट करत होतो, पण वातावरण इतकं छान होतं की गावात शूट करत असल्यासारखं वाटत होतं. मी स्वतःही उन्हाळ्यात आवश्यक ती काळजी घेत होते जसं की तुळशीच्या बियाचं पाणी, सब्जाचं पाणी आणि शॉटनंतर पांढरा स्टोल वापरणं. टीममधले सगळेच सुबोध दादा, हरीश आणि इतर कलाकार एकमेकांना सहकार्य करत होते. त्या दिवशी आम्ही गाण्याबरोबरच वृक्षारोपणाचा सीन ही शूट केला, ह्या गाण्याचं शूट करण्यासाठी आमच्याकडे फार कमी वेळ होता. आम्ही अवघ्या ४५ मिनिटांत गाण्याचं शूट पूर्ण केलं”.

आणखी वाचा – टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

शेवटी अभिनेत्री म्हणाली, “मला आशा आहे की हा सीन प्रेक्षकांना नक्की आवडेल. आणि शेवटी एवढंच म्हणेन, की आपण कलाकार म्हणून कधी कधी अशा परिस्थितीत शूट करतो पण काही गोष्टी तश्याच छान दिसतात आणि जर सोबत चांगली टीम असेल तर गोष्टीं थोड्या सोप्या वाटतात”.

Tags: marathi serialveen doghatli hi tutenazee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
 divyanka sirohi death reason

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.