शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 22, 2026 | 9:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Deepali Sayed Home Coming

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, "उंबरठ्यावर…"

Deepali Sayed Home Coming : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ हा पर्व आता संपला आहे. यंदाच्या या सीझनने रसिकांच्या मनात घर केलं. यंदाच्या या पर्वात अभिनेत्री दीपाली सय्यद बरीच चर्चेत राहिली. दीपालीने ‘बिग बॉस’च्या घरातील १०० दिवसांचा प्रवास पूर्ण केला. टॉप ५ स्पर्धकांपैकी ती एक होती. मात्र अंतिम टप्प्यात येताच दीपालीचा प्रवास संपला. आणि तिला घराबाहेर पडावं लागलं. शेवटच्या टप्प्यात असताना दीपालीला अनेकांनी पैशांनी भरलेली पेटी घेण्याचा सल्ला दिला. मात्र तिने हे पाच लाख रुपये नाकारले. आणि ती घराबाहेर पडली. इतकंच नाहीतर आता घराबाहेर येताच स्वतःच्या घरी जाताच दीपालीच तिच्या कुटुंबियांनाही जंगी स्वागत केलं. याचा व्हिडीओ शेअर करत तिने ‘बिग बॉस’च्या घरातील १०० दिवसांचा प्रवास काही मोजक्या शब्दांत मांडला आहे. या व्हिडीओमध्ये घरी जाताच आणि कुटुंबियांना भेटताच दीपाली खूपच खुश असल्याचं दिसलं.

दीपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये घरी येताच दीपालीच्या श्वानांनी तिचं स्वागत केलं. इतकंच नाहीतर औक्षण करत कुटुंबीयांनी तिला घरात घेतलं. यानंतर पहिल्यांदाच आजी झालेल्या दीपालीने तिच्या नातीला जवळ घेतलं. आईला तिने एक घट्ट मिठी मारली. केक कट करत तिने सगळ्यांना भरवला. या व्हिडीओमधील एक भावनिक क्षण म्हणजे दीपालीची मदतनीस दीपालीला १०० दिवसांनी घरी आलेली पाहताच रडू लागली. यावेळी दीपालीने तिला धीर दिला.

आणखी वाचा – “सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

View this post on Instagram

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “शंभर दिवस… घरापासून आणि स्वतःच्या लोकांपासून लांब राहणं किती कठीण असतं, हे या प्रवासाने शिकवलं. तो मानसिक ताण, ते टास्क आणि प्रत्येक क्षणाला होणारी घरची ओढ… हे सगळं आज एका क्षणात विरघळून गेलं. उंबरठ्यावर पाऊल ठेवताच घरच्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं. हा प्रवास खडतर होता, पण तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी तो पूर्ण करू शकली”.

आणखी वाचा – कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

‘बिग बॉस’च्या घरात असताना दीपालीच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. तिच्या सासूचं निधन झालं. ही गोष्ट बरेच दिवस दीपालीपासून लपवून ठेवली होती. मात्र, फॅमिली वीकमध्ये दीपालीला हे सत्य कळलं. तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटला.

Tags: bigg boss marathideepali sayedmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Aishwarya Rai updates

"आई ती शेवटी आईच", एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.