Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाची लगबग सुरु आहे. मराठीतील अनेक कलाकार मंडळी एकामागोमाग एक विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतेच मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांच्यापाठोपाठ अभिनेत्री-गायिका स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी या दोघांच्या लग्नालाही सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. गौतमी व स्वानंद यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कुठेही काही सांगितले नव्हते पण गौतमीची बहीण व अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या रिलेशनविषयी व लग्नाविषयी साऱ्यांनाच कुणकुण लागली. (Swanand Tendulkar and Gautami Deshpande Haladi Video On Instagram)
अशातच काल (२३ डिसेंबर) रोजी गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे मेहेंदी सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली. ही प्रेमाची कबुली देताच गौतमी व स्वानंदच्या नात्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या खास फोटोमध्ये दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. गौतमीच्या मेहंदी सोहळ्यातील हे खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अनेक चाहत्यांनी या फोटो व व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. अशातच आता त्यांच्या हळदी समारंभाचे काही खास क्षण समोर आले आहेत.
गौतमी व स्वानंद यांच्या हळदी समारंभाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोमध्ये गौतमी-स्वानंद दोघेही हळदीने माखल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर हळदी समारंभासाठी दोघांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान परिधान परिधान केल्याचे दिसत आहे. गौतमीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, तर स्वानंदने ही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून त्यावर कुर्त्याला साजेसा असा स्कार्पदेखील घेतला आहे. त्याचबरोबर त्याने काळ्या रंगाचा गॉगल परीधान केल्यामुळे या हळदी लूकमध्ये तो खुपच डॅशिंग दिसत आहे. तर व्हायरल फोटो व व्हिडीओमध्ये गौतमीचा क्युट अंदाज दिसून येत आहे.
स्वानंद हा ‘भाडिपा’ या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये काम करत असल्यामुळे त्याच्या या खास हळदी समारंभाला ‘भाडिपा’चे सर्व्हेसर्वा सारंग साठ्ये व त्याची पत्नी पॉला यांनी खास हजेरी लावली. दरम्यान, गौतमी व स्वानंद यांच्या हळदी समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.