बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही नुकतीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. गेले दोन दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी मराठमोळ्या व महाराष्ट्रीयन पद्धतीने या विधी पार पडल्या. अशातच काल (३ जानेवारी) रोजी दोघांचे नोंदणी पद्धतीने लग्न पार पडले आहे. त्यांच्या लग्नातील काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयरा-नुपूर यांच्या लग्नाला जवळचे कुटुंबीय, मित्रपरिवार व काही खास लोकांनी देखील हजेरी लावली होती. (Aamir Khan Dance Video)
आयरा-नूपुर यांच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये, आमिर खान त्याच्या अनेक पाहुण्यांसह पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावबरोबर नाचताना पाहायला मिळाला. या व्हायरल व्हिडिओमध्ये, आमिर खानने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. आमिर त्याच्या लेकीच्या लग्नात ‘मेरी प्यारी बेहनिया’ या गाण्यावर टाळ्या वाजवता नाचताना दिसत आहे. त्याचबरोबर किरण रावही आझादबरोबर डान्स करतानाचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
Aamir Khan full enjoy karte hue daughter ira Khan wedding superb moments im so happy. ????????????#AamirKhan@AKPPL_Official pic.twitter.com/Pgqg1zyqyR
— Sudha Ajmera (@SudhaAjmera13) January 3, 2024
या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आयरा-नूपुर यांनी अगदी अनोख्या पद्धतीने त्यांचे लग्न केल्यामुळे सध्या त्यांचे लग्न हा खूपच चर्चेचा विषय ठरला आहे. नवरदेव नूपुरने त्याच्या लग्नात कुठलाही लग्नाचा लूक न करता बनियन व शॉर्ट पॅंटवर हजेरी लावली होती. तर आयरानेही धोती चोली असा साधा ड्रेस परिधान केला होता. तसेच नूपुरने विवाहस्थळावर धावत जात नोंदणीकृतपणे एकमेकांशी लग्न केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयरा-नुपूर यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती आणि अखेरीस ही जोडी आता विवाहबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं असून त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही लवकरच होणार आहे. या रिसेप्शन सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळेल. या रिसेप्शन सोहळ्यात शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत सर्व मोठे कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.