करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा लोकप्रिय कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. अशातच या कार्यक्रमाचा आठवा सीजन सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांमुळे तसेच या कलाकारांच्या विविध वक्तव्यांमुळे हा कार्यक्रम नेहमीच खास ठरतो. या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली आहे. या शोच्या आगामी भागात कपूर सिस्टर्स हजेरी लावणार आहेत. (Janhvi And Khushi Kapoor Got Emotional Of Their Mother Sridevi)
करण जोहरच्या शोच्या आगामी भागामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर व खुशी कपूर या दिसणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका प्रोमोमध्ये या दोघी बहिणी एकमेकांबरोबर गंमत करताना दिसून आल्या. यावेळी त्यांनी एकमेकांवर विनोद करत व एकमेकांची मस्करी केली. त्याचबरोबर आई श्रीदेवीच्या आठवणीत भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले. आईच्या मृत्यूबद्दल कळताच त्यावेळी जान्हवीची काय प्रतिक्रिया होती याबद्दल तिने सांगितले.
याबद्दल जान्हवी असं म्हणाली की, “जेव्हा आईच्या निधनाबद्दलचा मला फोन आला तेव्हा मी माझ्या खोलीत होते आणि मला खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. मी रडत रडत तिच्या खोलीत धावत गेले. तेव्हा खुशीने माझ्याकडे पाहताच क्षणी तिने तिचे रडणे थांबवले आणि ती माझ्याशेजारी येऊन बसली. मला शांत करू लागली आणि तेव्हापासून मी तिला कधीही रडताना पाहिले नाही.”
खुशी व जान्हवी दोघे बहिणी त्यांच्या आईच्या आठवणीत भावुक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, श्रीदेवी यांच्या निधनाची बातमीने अवघ्या देशासह बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या निधनानंतर जान्हवी-खुशीसह त्यांची सावत्र भावंडे अर्जुन व अंशुला कपूर यांच्याशी जवळीक वाढली.