शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “अंत्यसंस्काराला गेलेच नाही अन्…”, सुशांतच्या मृत्यूवेळी ढसाढसा रडली, आता अंकिता लोखंडेचं मोठं विधान, म्हणाली, “विकी म्हणाला की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 21, 2023 | 11:26 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bigg boss 17 ankita lokhande told about she did not attend sushant singh rajput funeral

"मी त्याच्या अंत्यसंस्काराला गेले नाही", अंकिता लोखंडेचं सुशांत सिंह राजपूतबद्दल मोठं विधान, म्हणाली, "विकी म्हणाला की..."

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासून अनेकदा तीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दलही ती व्यक्त झाल्याचे पाहायला मिळालं आहे. अशातच अभिनेत्रीने पुन्हा एकदा सुशांतच्या निधनाबद्दल भाष्य केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचं कारण ठरली आहे. मुनव्वर फारुकीबरोबर सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली.

अंकिता मुनव्वरला सांगते की, “ब्रेकअपबद्दलची तुझी शायरी तिला जुन्या आठवणी आठवून देते. या सगळ्या गोष्टी बोलत जाऊ नकोस, त्याचा माझ्यावर खूप परिणाम होतो. पण तुझी शायरी चांगली होती, मला खूप आवडली”. त्यानंतर ती सुशांतच्या ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील ‘कौन तुझे’ हे गाणं गुणगुणू लागते. यापुढे अंकिता त्याला असं म्हणते की, “सुशांत खूप चांगला माणूस होता. तो होता असं म्हटलं की मला खूप विचित्र वाटतं. पण आता ठीक आहे. आता सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आहेत. सुशांत विकीचाही चांगला मित्र होता. पण तो आता या जगात नाही, त्यामुळे खूप वाईट वाटतं आणि ही खूप विचित्र भावना आहे.” त्यानंतर दोघेही गप्पा मारत असताना मुनव्वर तिला सुशांतच्या मृत्यूबद्दल विचारतो.

#AnkitaLokhande talks abt SSR, what a great man he was, his funeral, how it’s difficult talking abt him in past tense n breaks down remembering him n her dad ❤️#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/MWUshVXPG0

— Rachit (@rachitmehra_2) November 20, 2023

आणखी वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला बक्षीसरुपी पत्र मिळताच झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “डबडबलेल्या डोळ्यांनी…”

यावर अंकिता त्याला असं म्हणते की, “मी तुला आता याबद्दल काही सांगू इच्छित नाही. असं नाही की मला काही सांगायचं नाही. पण मला याविषयी आत्ता काही बोलायची इच्छा नाही.” यावर मुनव्वर म्हणतो की, “सुशांत बद्दल लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत. पण तुम्ही त्याला अधिक चांगल्याप्रकारे ओळखत होता.” यावर अंकिता सुशांतच्या अंत्यसंस्कारालाही गेली नसल्याचा खुलासा ती करते. तेव्हा ती असं म्हणते की, “ते माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. मी त्याच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते. मी जाऊ शकलेच नाही. विकी म्हणाला होता की तू जाऊन ये. पण मी नाही म्हणाले. कारण मी ते बघूच शकले नसते? असा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच घेतला नव्हता. मुन्ना मी माझ्या वडिलांनादेखील पहिल्यांदा असं पाहिलं. एखाद्याला गमावणे म्हणजे काय असते ते मी तेव्हा पाहिले. या सगळ्या गोष्टी आठवून खूप वाईट वाटतं”.

आणखी वाचा – Ind VS Aus : कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याचं आलं समोर, मराठी अभिनेत्याची संतापजन पोस्ट, म्हणाला, “लाज वाटली…”

दरम्यान एकेकाळी अंकिता सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर ७ वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात ती अनेकदा सुशांतबद्दल बोलली आहे आणि आता पुन्हा एकदा ती त्याच्यामुळे भावुक झाली असल्याचे पाहायला मिळाले.

Tags: actressankita lokhandebigg boss 17entertainment newssushant singh rajput
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Jahnavi Killekar New Two Wheeler

'भाग्य दिले….' फेम जान्हवी किल्लेकरने नवी दुचाकी घेताच नेटकऱ्यांनी केलेली कमेंट लक्षवेधी, म्हणाले, "पेट्रोल परवडत..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.