मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक मालिका व चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारली आहे. केवळ मराठीच नाही, तर ‘बाजीराव मस्तानी’ या बॉलिवूड चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे चाहत्यांनी कौतुक केले होते. अभिनयाबरोबर ती उत्तम नृत्यांगणा आहे. शिवाय, तिच्या सोशल मीडियावरील विविध पोस्ट्सची नेहमीच चर्चा होत असते. आता सुखदाला नुकतंच एक सरप्राईझ आलं. जे पाहून ती अक्षरशः भारावली. शिवाय, तिने त्या व्यक्तीचे आभार मानताना एक खास पोस्टदेखील शेअर केली आहे. (Sukhada Khandkekar shared a letter)
अशी ही सर्वगुण संपन्न अभिनेत्री लवकरच सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता सुनील बर्वे सुधीर फडके यांची मध्यवर्ती भूमिका साकारणार असून ज्यात शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्य आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सुखदा यात प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांची भूमिका साकारणार आहे. दिवाळीनिमित्त तिला एक विशेष भेट मिळाली असून ज्यात त्या भेटवस्तूसह एक पत्र पाठवण्यात आलं. ज्यात दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी तिने साकारलेल्या भूमिकेचे कौतूक केलं आहे.
हे देखील वाचा – “असे खडूस-अप्पू होणे नाही”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पूचा शेवटचा निरोप; भावुक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
सुखदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पत्र पोस्ट केलं. ज्यात ती म्हणते, “काल संध्याकाळी आलेल्या अनेक पार्सल्समधून ‘दिवाळी भेट’ म्हणून आलेला एक बॉक्स उघडायला घेतला आणि एक कधीही न विसरता येण्यासारखं सरप्राईज मिळालं. आता अजून एखादा मिठाईचा बॅाक्स किंवा गोडाधोडाचं काहीतरी असेल म्हणुन ते उघडलं तर निघालं गोडच, पण एक पत्र ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या स्व. बाबूजींवर येऊ घातलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी या चित्रपटात मी साकारलेल्या माणिक वर्मांच्या भुमिकेचं कौतुक करणारा पहिलाच शब्द, तो म्हणजे ‘प्रिय माणिकबाई’. वाचून तिथेच काळजाचा ठोका चुकला. पुढे वाचायला सुरूवात केली खरी पण डबडबलेल्या डोळ्यांनी पुढचं काही दिसेना.”
हे देखील वाचा – “पैलवान लवकरच दिसणार नव्या भूमिकेत?”, ‘सुख म्हणजे’ फेम अभिनेता कपिल होनरावच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “भेटू लवकरचं…”
“चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यासाठी असा पुरस्कार मिळणं ह्याहून मोठं भाग्य कुठलं. या ‘अमृताहूनी गोड’ भेटीसाठी दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे मनापासून आभार. स्व. बाबूजी आणि स्व. माणिकबाई यांचे स्वर आशीर्वाद रुपी या नंदादीपासारखे कायम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तेवत राहोत.”, असं ती यात म्हणाली आहे. तर या पत्रात दिग्दर्शकाने सुखदाचं भरभरून कौतुक केलं आहे. तिला देण्यात आलेलं हे पत्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून कलाकारांसह चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहे.