‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासून अनेकदा तीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. तसेच अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दलही ती व्यक्त झाल्याचे पाहायला मिळालं आहे. अशातच अभिनेत्रीने पुन्हा एकदा सुशांतच्या निधनाबद्दल भाष्य केलं आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचं कारण ठरली आहे. मुनव्वर फारुकीबरोबर सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली.
अंकिता मुनव्वरला सांगते की, “ब्रेकअपबद्दलची तुझी शायरी तिला जुन्या आठवणी आठवून देते. या सगळ्या गोष्टी बोलत जाऊ नकोस, त्याचा माझ्यावर खूप परिणाम होतो. पण तुझी शायरी चांगली होती, मला खूप आवडली”. त्यानंतर ती सुशांतच्या ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील ‘कौन तुझे’ हे गाणं गुणगुणू लागते. यापुढे अंकिता त्याला असं म्हणते की, “सुशांत खूप चांगला माणूस होता. तो होता असं म्हटलं की मला खूप विचित्र वाटतं. पण आता ठीक आहे. आता सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आहेत. सुशांत विकीचाही चांगला मित्र होता. पण तो आता या जगात नाही, त्यामुळे खूप वाईट वाटतं आणि ही खूप विचित्र भावना आहे.” त्यानंतर दोघेही गप्पा मारत असताना मुनव्वर तिला सुशांतच्या मृत्यूबद्दल विचारतो.
#AnkitaLokhande talks abt SSR, what a great man he was, his funeral, how it’s difficult talking abt him in past tense n breaks down remembering him n her dad ❤️#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/MWUshVXPG0
— Rachit (@rachitmehra_2) November 20, 2023
यावर अंकिता त्याला असं म्हणते की, “मी तुला आता याबद्दल काही सांगू इच्छित नाही. असं नाही की मला काही सांगायचं नाही. पण मला याविषयी आत्ता काही बोलायची इच्छा नाही.” यावर मुनव्वर म्हणतो की, “सुशांत बद्दल लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत. पण तुम्ही त्याला अधिक चांगल्याप्रकारे ओळखत होता.” यावर अंकिता सुशांतच्या अंत्यसंस्कारालाही गेली नसल्याचा खुलासा ती करते. तेव्हा ती असं म्हणते की, “ते माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. मी त्याच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते. मी जाऊ शकलेच नाही. विकी म्हणाला होता की तू जाऊन ये. पण मी नाही म्हणाले. कारण मी ते बघूच शकले नसते? असा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच घेतला नव्हता. मुन्ना मी माझ्या वडिलांनादेखील पहिल्यांदा असं पाहिलं. एखाद्याला गमावणे म्हणजे काय असते ते मी तेव्हा पाहिले. या सगळ्या गोष्टी आठवून खूप वाईट वाटतं”.
दरम्यान एकेकाळी अंकिता सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर ७ वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ‘बिग बॉस’च्या घरात ती अनेकदा सुशांतबद्दल बोलली आहे आणि आता पुन्हा एकदा ती त्याच्यामुळे भावुक झाली असल्याचे पाहायला मिळाले.