शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ind VS Aus : कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याचं आलं समोर, मराठी अभिनेत्याची संतापजनक पोस्ट, म्हणाला, “लाज वाटली…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 21, 2023 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Kelkar On Kapil Dev

Ind VS Aus : कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याचं आलं समोर, मराठी अभिनेत्याची संतापजन पोस्ट, म्हणाला, "लाज वाटली…"

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान ऑस्टेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत यंदाच्या विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. यावरून सर्व भारतीयांमध्ये नाराजीचा उमटलेला सूर पाहायला मिळाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी लाखोंच्या घरात क्रिकेटप्रेमी तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. शिवाय भारताचे अनेक माजी खेळाडू देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. (Abhijeet Kelkar On Kapil Dev)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित केलं नव्हतं. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये आपला पहिला विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या २०२३ च्या विश्वचषकासाठी बीसीसीआयने माजी खेळाडू कपिल देव यांना आमंत्रित केलं नव्हतं, असा दावा कपिल देव यांनी केला असल्याचं समोर आलं आहे. यावरून आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट संतापजनक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “असे खडूस-अप्पू होणे नाही”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पूचा शेवटचा निरोप; भावुक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

अभिजीत केळकरने कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याने एक संतप्त पोस्ट त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. “आयसीसी, क्रिकेट वर्ल्डकप, बीसीसीआयचा त्रिवार निषेध! हे अत्यंत चुकीचं असून याबद्दल लाज वाटली पाहिजे…लव्ह यू कपिल देव सर” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिजीतने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत.

आणखी वाचा – “पैलवान लवकरच दिसणार नव्या भूमिकेत?”, ‘सुख म्हणजे’ फेम अभिनेता कपिल होनरावच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “भेटू लवकरचं…”

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी संवाद साधत याचा खुलासा केला. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार त्यांना अंतिम सामन्याचं बीसीसीआय कडून आमंत्रण मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कपिल देव यांनी म्हटलं की, “मला माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर (१९८३ ची टीम) हा अनुभव घ्यायचा होता पण, सोहळ्यासाठी आम्हाला आमंत्रण दिलं नाही. त्यांनी मला बोलावलं नाही म्हणून मी गेलो नाही. अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी लोक विसरून जातात” असं मत त्यांनी मांडत नाराजी व्यक्त केली.

अभिजितच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “आमंत्रण शिवाय गेले असते तर तुमचा मोठेपणा दिसला असता टीम आपली होती आपल्या टीमसाठी आमंत्रण कशाला हवं” यावर प्रतिउत्तर देत अभिजीतने नेटकऱ्याची बोलतीच बंद केली आहे. अभिजीत कमेंट करत म्हणाला, “तुम्ही पण सगळीकडे आमंत्रणाशिवायच जाता का? जरा विचार करून बघा”. यावर त्या नेटकऱ्याने अभिजीतचं म्हणणं पटलं असल्याचं कबूलही केलं.

Tags: abhijeet kelkarentertainmentkapil devmarathi actorworld cup 2023
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
bigg boss 17 ankita lokhande told about she did not attend sushant singh rajput funeral

Bigg Boss 17 : "अंत्यसंस्काराला गेलेच नाही अन्…", सुशांतच्या मृत्यूवेळी ढसाढसा रडली, आता अंकिता लोखंडेचं मोठं विधान, म्हणाली, "विकी म्हणाला की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.