रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ती नसती तर मी भरकटलो असतो अन्…”, पत्नीबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, “एकटीनेच सगळं काम करते आणि…  ”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 26, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf nivedita saraf married life

“ती नसती तर मी भरकटलो असतो अन्...”, पत्नीबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, “एकटीनेच सगळं काम करते आणि... ”

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे अशोक सराफ व निवेदिता सराफ. अशोक व निवेदिता वयाच्या या टप्प्यावरही तितक्याच मेहनतीने व उत्साहाने काम करतात. दोघांनाही एकमेकांची साथ आहे. अशोक मामांनाही एखादा पुरस्कार मिळाला की, निवेदिता यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कित्येकदा हे सगळ्यांनीच प्रत्यक्षात पाहिलं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निवेदिता यांनी अशोक यांची साथ दिली आहे. म्हणूनच की काय अशोक मामा पत्नीबाबत अगदी खुलेपणाने बोलतात. आताही एका मुलाखतीत त्यांनी भावुक होत निवेदिता यांच्याबाबत भाष्य केलं. ते बोलत असताना प्रेम म्हणजे नक्की काय? याचा अर्थ नव्याने उमगला. (Ashok Saraf nivedita saraf married life)

अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत अशोक यांनी निवेदिता यांच्याबाबत सांगितलं. ते म्हणाले, “एका वाक्यात मी सांगेन की, ती आहे म्हणून मी आहे. ती नसती तर मी भरकटलो असतो. मला घराकडे बघावच लागत नाही. मी फक्त काम करत राहतो. सगळा घराचा भार तिने घेतला आहे. सगळं घरचं काम ती करते. माझ्या व्यवहारापासून सगळं तिच बघते. माझे फोनही तिच घेते. सगळं म्हणजे सगळं काम तिच करते. मला काही करावंच लागत नाही. ती स्वतः एक अभिनेत्री असूनही हे सगळं करते”.

आणखी वाचा – ‘सैयारा’ पाहून भारती सिंगला अश्रू अनावर, पती हर्ष लिंबाचियाही झाला भावुक, चित्रपटाबाबत म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

“अजूनही तिची खूप कामं सुरु आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक प्रसंग सांगतो. माझी मानेचं दुखणं वाढलं होतं. तेव्हा नेहमी ती रात्र घरी आली की, माझ्या मानेला मलम लावल्याशिवाय ती झोपायची नाही. मग रात्री कितीही वाजता आली तरी ती हे काम करायचीच. माझ्यापेक्षा ती घरी उशीरा येते. मी रात्री ८.३० वाजता वगैरे येतो. पण ती ११ वाजल्याशिवाय घरी पोहोचत नाही. माणूस कसा आहे हे एकदा कळलं ना की, तुमचं नातं अधिक घट्ट होतं. समोरचा माणूस काय आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे”.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ संपणार?, मालिकेच्या कथानकाबद्दल अर्जुन सुभेदार व्यक्त, म्हणाला, “ही कोर्ट केस संपली की…”

“आता मी तिच्यावर सगळं सोडून जातो. फोन करुन फक्त विचारतो. पण तिने सगळं केलेलं असतं. माझ्या आयुष्यात मी बऱ्याच गोष्टी केल्या. पण आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट मी कोणती केली असेल तर ते मी तिच्याशी लग्न केलं. आमची भांडणं पण होतात. पण कुठल्याही भांडणात मी कितीही भडकलो तरी पहिली ती येते. अजून काय पाहिजे”.

Tags: ashok sarafentertainment newsmarathi actornivedita saraf
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
nimish kulkarni engagement

"जावईबापू…", निमिष कुलकर्णीचा साखरपुडा होताच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांच्या कमेंट्स, शिवाली परबच्या कमेंटची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.