गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ संपणार?, मालिकेच्या कथानकाबद्दल अर्जुन सुभेदार व्यक्त, म्हणाला, “ही कोर्ट केस संपली की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 26, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tharala tar mag

'ठरलं तर मग' संपणार?, मालिकेच्या कथानकाबद्दल अर्जुन सुभेदार व्यक्त, म्हणाला, "ही कोर्ट केस संपली की…"

tharala tar mag : ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकवर्गाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात घर केलं. सध्या आता मालिकेत रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसात वात्सल्य आश्रमात जानेवारी 2023 मधील विलासच्या खून प्रकरणाचा निकाल लागणार आहे. यासंदर्भातील अनेक प्रोमो व्हायरल होत आहेत. विलास खुनाचा निकाल लागताच मालिका निरोप घेणार का प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना सतावू लागला. ही केस अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख हे दोन्ही वकील सांभाळत आहेत, आणि अखेर ते आमनेसामने आले आहेत.

साक्षी, प्रिया आणि महिपत या त्रिकुटाचा खोटेपणा उघडकीस आणण्यासाठी आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मालिकेचे आगामी भागांचे प्रोमो पाहून जवळपास हे निश्चित झाले आहे की, निकाल मधुभाऊंच्या बाजूने लागेल. मात्र, यानंतर अशी चर्चा आहे की, Tharala Tar Mag ही मालिका संपणार आहे का?. या प्रश्नाचे उत्तर मालिकेतील कलाकारांनी व्हिडिओद्वारे दिले आहे. अर्जुन सुभेदारसह मालिकेतील प्रताप, चैतन्य तसंच अस्मितानेही TTM संपणार की नाही, याबद्दल स्पष्ट उत्तर दिले.

आणखी वाचा – “लहान मुलाला तरी सोडा”, दिसण्यावरुन देवोलिनाच्या लेकाला ट्रोल करताच चाहते भडकले, म्हणाले, “नीच आणि विचित्र…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला असे कॅप्शन दिले आहे की, “वात्सल्य आश्रम कोर्ट केस संपत असली तरी, इतर मोठे खुलासे होणे बाकी आहेत”. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुनने असे म्हटले की, “नमस्कार, मी अमित भानुशाली. आज मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की, बऱ्याच लोकांनी असे विचारले की, कोर्ट केस संपणार आहे तर मालिकाही संपतेय की काय? तर, असं अजिबात नाही आहे. मालिका संपत नाही आहे, फक्त मधुभाऊंची जी केस आहे, ती संपणार. अडीच-पावणे तीन वर्ष लागली या कोर्ट केसला संपायला पण यानंतरही बरंच काही बाकी आहे”.

आणखी वाचा – “मन भरुन आलं”, ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाच्या पहिल्याच दिवशी कुशल बद्रिके भावुक, म्हणाला, “माझे बाबा…”

तो पुढे म्हणाला की, “खरी तन्वी कोण आहे, सायलीच खरी तन्वी आहे का आणि नागराज-महिपत यांच्या केससुद्धा आहेत. त्यामुळे अर्जुन सुभेदार पुन्हा एकदा कोर्टात वकिलाच्या वेशात तुम्हाला दिसेल. त्यामुळे मालिका संपणार असं तुम्ही मनात ठेवू नका. तुमचं इतकं प्रेम आहे, इतकी माया आहे की, शो कधीच संपणार नाही”. अर्जुनच्या या उत्तराने प्रेक्षकांना धीर मिळाला आहे.

Tags: entertainmentmarathi serialTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bharti singh cry 

'सैयारा' पाहून भारती सिंगला अश्रू अनावर, पती हर्ष लिंबाचियाही झाला भावुक, चित्रपटाबाबत म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.