मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 17, 2026 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shalva Kinjawadekar new serial

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

Shalva Kinjawadekar new serial : ‘स्टार प्रवाह’वर २९ जून पासून सुरु होणाऱ्या ‘विसरु नको तू मला’ मालिकेतून शाल्व किंजवडेकर आणि तन्वी मुंडले ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणातल्या गुहागरमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. नयनरम्य लोकेशन्स, नवी जोडी आणि नवी लव्हस्टोरी असा तिहेरी योग जुळून आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत शाल्व सूर्या तांडेल ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नाखवा कुटुंबातील सूर्या हा घरातल्या प्रत्येकाचा लाडका, जबाबदार आणि कष्टाळू मुलगा आहे.

बाहेरून रांगडा आणि कणखर वाटणारा सूर्या मनाने मात्र अत्यंत प्रेमळ, दिलदार आणि इतरांच्या मदतीला धावून जाणारा आहे. त्याच्या जन्मानंतर कुटुंबाच्या व्यवसायाला भरभराट मिळाली त्यामुळे घरातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्याच्या हस्तेच केली जाते. त्यामुळे तो केवळ कुटुंबाचा सदस्य नसून त्यांच्या आयुष्यातील लकी चार्म मानला जातो.

आणखी वाचा – लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

सूर्या या व्यक्तिरेखेविषयी सांगताना शाल्व म्हणाला, ‘सूर्या हा नारळासारखा आहे. वरून कडक वाटतो पण आतून तितकाच गोड आणि मोठ्या मनाचा आहे. या भूमिकेसाठी मी गेली चार महिने माझ्या फिजिकवर मेहनत घेत आहे. योग्य आहार आणि दररोज तीन तासांचा वर्कआऊट हा माझ्या आयुष्याचा भाग झाला आहे. सुरुवातीला मी इतका शिस्तबद्ध नव्हतो, पण या भूमिकेमुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता आला. सूर्या आणि त्याची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल असा मला विश्वास आहे.”

आणखी वाचा – “लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

शाल्वची मेहनत आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी भावनिक प्रेमकथा यामुळे ‘विसरू नको तू मला’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
 rakhi sawant latest video

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, "ती स्वस्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.