सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 17, 2026 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sanchita ugale suicide

"लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले", आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

sanchita ugale suicide : टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आता संचिताचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. पोलिस फोनमधील चॅट आणि गॅलरी तपासत आहेत. फोनमधून काहीतरी हटवल्याचा संशय असल्याने, फोन फॉरेन्सिकसाठी देखील पाठविला जाईल. अभिनेत्रीच्या वडिलांनीही लेकीच्या मृत्यूनंतर दावा केला आहे. तिचा छळ होत होता आणि तिच्यावर खूप दबाव होता. संचिता उगलेचे वडील मच्छिंद्र उगले यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, काही मागण्यांबाबत त्यांच्या मुलीवर सतत दबाव आणि छळ होत होता. ते म्हणाले, “ती काळजीत होती. खरे कारण तिने कधीच सांगितले नाही, पण ती अनेकदा नाराज व्हायची. तिचा मूड चांगला असल्याचं दिसत असतानाही ती अचानक उदास व्हायची”.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता यांच्यावर सहा महिन्यांपासून डिप्रेशनवर उपचार सुरु होते. संचिताच्या डॉक्टरांशी झालेल्या संभाषणाच्या गप्पा पोलिसांना मिळाल्या आहेत. संचिता डिप्रेशनमध्ये का होती, हेही पोलिसांना डॉक्टरांकडून समजणार असून त्या दिशेने पुढील तपास करण्यात येणार आहे.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, टेलिव्हिजनमध्ये काम करताना संचिता खूप नाराज असायची. संचिता आणि डॉक्टर यांच्यातील गप्पांचे काही चॅट एबीपी माझाला मिळाले आहेत.

आणखी वाचा – लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

संचिता आणि तिच्या डॉक्टरांच्या गप्पा

डॉक्टर- वाईट भविष्य?
संचिता- मला वाटते की मला गंभीर मानसिक समस्या आहे. फोकस खूपच कमी आहे. मला काहीच ऐकू येत नाही आहे.
डॉक्टर- तुम्ही माझ्यासोबत ऑनलाइन सत्र घेऊ शकाल का?
संचिता- अगदी.
डॉक्टर: तुम्ही कधी सुरू करू शकता ते सांगा. तुला पाहिजे तेव्हा आणि तुला बरे वाटत नसेल तेव्हा तू माझ्याशी बोलू शकतेस.
संचिता- मला कधीच बरे वाटत नाही. मी पूर्णपणे हरवून जाते.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

डॉक्टर- काळजी करू नका, मी तुम्हाला बरे करेल.
संचिता- कधी, ६ महिने झाले. मी खूप भन्नाट वागत आहे. लोक मला घाबरतात.
डॉक्टर- प्रथम आपण आपले सत्र सुरु करावे. त्याआधी मी काही करु शकत नाही. प्रथम आपण ऑनलाइन सत्र घेऊ. मग जेव्हा तुम्हाला आराम असेल तेव्हा समोरासमोर सत्र घ्या. मला तुमच्याबद्दल सर्व तपशील जाणून घ्यायचे आहेत. तुमच्या भूतकाळाबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. मग मी तुमच्याशी आत्मविश्वासाने वागू शकेन.
संचिता- मी माझे सर्व पैसे खर्च केले, पण कोणतीही थेरपी काम करत नाही.
डॉक्टर- सकारात्मक राहा. देवावर श्रद्धा ठेवा.
संचिता- माझ्यावर भरवसा नाही.
डॉक्टर : मग तुला माझ्याकडून काय मदत हवी आहे?
संचिता- माहीत नाही, पण पुढे काय काम करते ते पाहू.
डॉक्टर- स्वतःची काळजी घ्या.
संचिता- हो.

Tags: entertainmentsanchita ugaletelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Shalva Kinjawadekar new serial

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.