सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 17, 2026 | 9:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sanchita ugale death reason

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

sanchita ugale death reason : टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘छावा’ या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यूचे प्रकरण अधिकच गाजत आहे. या अभिनेत्रीने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून संचिताच्या मृत्यूप्रकरणी रोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत. संचिताच्या सहकलाकारांनीही अनेक दावे केले होते आणि आता वडिलांनीही धक्कादायक दावा केला आहे. संचिता उगले हिच्या वडिलांनी आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचा दावा केला आहे. तिचा छळ होत होता आणि तिच्यावर खूप दबाव होता. संचिता उगले यांच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना, कुटुंबीयांनी मुलीवर दबाव, भावनिक संघर्ष आणि अभिनेत्रीच्या मृत्यूला कारणीभूत परिस्थितीबद्दल सांगितले आहे. संचिताचे वडील सांगतात की, त्यांची मुलगी खूप नैराश्यात होती. कधी कधी असं होतं की ती एका क्षणी आनंदी व्हायची आणि दुसऱ्या क्षणी डिप्रेशनमध्ये जायची.

संचिता उगलेचे वडील मच्छिंद्र उगले यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, काही मागण्यांबाबत त्यांच्या मुलीवर सतत दबाव आणि छळ होत होता. ते म्हणाले, “ती काळजीत होती. खरे कारण तिने कधीच सांगितले नाही, पण ती अनेकदा नाराज व्हायची. तिचा मूड चांगला असल्याचं दिसत असतानाही ती अचानक उदास व्हायची”. तेव्हा संचिताच्या वडिलांनी सांगितले की, कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आले आणि तेव्हापासून सर्वांनी तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. वडिलांच्या म्हणण्यानुसार, ते अनेकदा संचितासोबत राहत असे कारण त्यांना माहीत होते की मुलगी अनेकदा अडचणीत असते.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

मात्र, तिचा मानसिक त्रास इतका वाढेल की ती एवढं मोठं पाऊल उचलेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. कुटुंबाचे दु:ख व्यक्त करताना संचिताचे वडील म्हणाले, “आम्ही हे पाहिले होते, म्हणूनच आम्ही तिच्यासोबत रोज राहत होतो. फक्त अर्धा तास आम्ही तिच्याबरोबर नव्हतो, आणि तुम्ही ही आमची चूक मानू शकता. पण ती एवढ्या खोल डिप्रेशनमध्ये जाईल की ती एवढं पाऊल उचलेल याची आम्हाला कल्पना नव्हती”.

आणखी वाचा – भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

संचिताचे मच्छिंद्र उगले यांनीही आपल्या मुलीचा सतत छळ आणि दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. याला जबाबदार कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी पैशांशी संबंधित बाबींसह वारंवार मागण्या केल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे तिच्या अडचणी आणखी वाढल्या. या चिंतेबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘आम्ही तिच्याशी बोललो, पण तिचा छळ केला जात होता. कोणी ना कोणी तिचा छळ करत होतं, पैशाची किंवा इतर गोष्टींची मागणी करत होतं आणि तिच्यावर सतत दबाव टाकून त्रास देत होतं. ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घडत होते. सत्य माझ्यासमोर नक्कीच येईल, पण हे नक्कीच घडत होतं”.

Tags: actress sucidesanchita ugaletelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Rushi Manohar Marathi Actor

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच 'कप बशी' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.