nimish kulkarni engagement : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. निमिषने थेट फोटो शेअर करत साखरपुडा केला असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. २५ जुलै २०२५ रोजी निमिषने त्याच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. निमिष कुलकर्णीने कोमल भास्करसह साखरपुडा समारंभ उरकला. अभिनेत्याच्या साखरपुड्याचे अचानक समोर आलेले फोटो पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. साखरपुड्याचे फोटो समोर येताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचला. याशिवाय त्याने मालिकांमधूनही अभिनय करत प्रेक्षकांची मन जिंकली.
अशातच आता निमिष व कोमल यांनी पारंपरिक अंदाजात साखरपुडा केला असून लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. निमिषने ही गुडन्यूज दिल्यानंतर अनेक चाहतेमंडळी त्याच्यावर कौतुकाचा शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्राची हास्यजत्रातील कलाकार मंडळींनीही निमिषच्या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा साखरपुडा संपन्न, लूकने वेधलं लक्ष, कोण आहे होणारी पत्नी?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनी निमिशने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर “खूप खूप अभिनंदन जावईबापू” अशी कमेंट केली आहे. शोमध्ये एकत्र स्किट सादर करताना निमिश आणि समीर चौघुले जावई आणि सासरेबुवा अशी पात्रं साकारताना दिसले. तर शिवाली परबने या पोस्टवर ‘माझी शोनी’ असं म्हटलं आहे. यावर नेटकऱ्यांनी शिवालीची खिल्ली उडवत “शिवु तुझ्या निषिम गेला गं बाईं! आता काय?”, “शेवटी कंटाळून निमिषने लग्न केलं”, असं म्हटलं आहे. तर शिवालीने खास स्टोरीही पोस्ट करत, “खूप खूप अभिनंदन माय बेबीज. खूप प्रेम. कायम एकमेकांबरोबर राहा. तुम्हाला कोणाची नजर ना लागो”, असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – “ती नसती तर मी भरकटलो असतो अन्…”, पत्नीबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, “एकटीनेच सगळं काम करते आणि… ”

तर निखिल बनेने कमेंट करत, “अभिनंदन निमू आणि कोमू, बाकी भेटलो की बोलूच”, असं म्हटलं आहे. तर गौरव मोरेनेही कमेंट करत, “अभिनंदन भाई”, अशी हटके कमेंट केली आहे. तर वनिता खरात आणि नम्रता संभेरावनेही “अभिनंदन”, असं म्हटलं आहे. तर नम्रता संभेरावने कमेंट करत, “काय बातमी आहे. अभिनंदन”, असं म्हटलं आहे. तर प्रियदर्शिनी इंदलकरने “काय?”, असा सवाल या पोस्टवर केला आहे. हास्यजत्रेशिवाय मनोरंजन विश्वातील आशुतोष गोखले, सौरभ चौघुले, स्पृहा जोशी, अक्षया नाईक या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.





