सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 17, 2026 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rushi Manohar Marathi Actor

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच 'कप बशी' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

Rushi Manohar Marathi Actor : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे दाखल होत असतात. काही कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून लक्ष वेधून घेतात, तर काही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. या नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता ऋषी मनोहर. रंगभूमीवर आपल्या अभिनयाची पक्की पायाभरणी करणाऱ्या ऋषीने विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ नाटक आणि ‘पेट पुराण’ सारख्या वेबसिरीज मधून त्याच्या सहज अभिनयाची, प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सची आणि पात्रांमध्ये समरस होण्याच्या क्षमतेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

आजच्या स्पर्धात्मक वातावरणात अभिनयाची खोली आणि नायकाला साजेसं व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टींचा संगम क्वचितच पाहायला मिळतो. ऋषी मनोहरमध्ये ही दोन्ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्याकडे एका आश्वासक अभिनेत्याच्या नजरेने पाहिले जात आहे. दरम्यान, येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होणारा ‘कप बशी’ हा चित्रपट ऋषीच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटसृष्टी नेहमीच नव्या दमदार कलाकाराच्या शोधात असते. त्या शोधात ऋषी मनोहर हा चेहरा अधिकाधिक ठळक होताना दिसत आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

रंगभूमीवर घडलेल्या ऋषी मनोहर यांची खासियत म्हणजे प्रत्येक भूमिकेतील भावविश्व अचूकपणे उलगडण्याची त्यांची क्षमता. आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना ऋषी मनोहर सांगतो, “प्रत्येक भूमिका माझ्यासाठी केवळ एक व्यक्तिरेखा नसते, तर स्वतःला नव्याने शोधण्याची संधी असते. अभिनेता म्हणून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं, अधिक प्रामाणिक आणि अधिक परिणामकारक साकारण्याचा माझा प्रयत्न असतो. ‘कप बशी’मधील भूमिका माझ्यासाठी विशेष ठरली आहे. या भूमिकेतून प्रेक्षकांना माझ्या अभिनयाची एक नवी बाजू अनुभवायला मिळेल, आणि त्या प्रवासाशी ते मनापासून जोडले जातील, अशी आशा आहे.”

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
sanchita ugale suicide

"लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले", आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.