आपल्या बहारदार अभिनयाने नाटकाचा पडदा, चित्रपट-टीव्हीची स्क्रीन अन् बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेला भारावून टाकणारे अभिनेते म्हणजे म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांना नुकताच यंदाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या विनोदी अभिनयाने कधी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू तर कधी आशयघन भूमिका साकारत डोळ्यात टचकन पाणी आणणारे अभिनेते म्हणून त्यांची ख्याती आहे.
अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच मनोरंजन सृष्टीसह त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशोक सराफ यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ यांची पत्नी व अभिनेत्री निवेदिता सराफ यांनादेखील आनंदाची भावना व्यक्त केली आहे. अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला असून आता या पुरस्काराममुळे आणखी जबाबदारी आल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
याचनिमित्ताने ‘इट्स मज्जा’शी अशोक सराफ यांनी पत्नी निवेदिता सराफ यांच्यासह खास संवाद साधला. यावेळी मुलाखतीत निवेदिता यांनी अशोक सराफ यांना पद्मभूषण मिळावा अशी इच्छाही व्यक्त केली आहे. ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात त्या असं म्हणाल्या की, “अशोक सराफ यांना पद्मश्री नाही, पण त्यांना पद्मभूषण मिळावा असं मला वाटतं. पद्मश्री हा केंद्र सरकार अंतर्गत येणारा विषय आहे. पण महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी व जन्मभूमी आहे आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा या महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. तोच अशोक यांना मिळाला याबद्दल मला आनंदच आहे.”
यापुढे निवेदिता यांनी ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजदत्ता यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच निवेदिता व अशोक सराफ यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार मानले आहेत. यापुढे त्यांनी निवड समितीलाही धन्यवाद म्हटले. त्याचबरोबर मराठी मनोरंजन सृष्टीतील सर्व कलाकार व चाहत्यांचे त्यांनी याद्वारे आभार मानले.