शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळताच अशोक सराफांच्या राहत्या घरी साजरा होतोय खास क्षण, पत्नी व मोठ्या बहिणीने केलं औक्षण अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 31, 2024 | 12:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar

'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार मिळताच अशोक सराफांच्या राहत्या घरी साजरा होतोय खास क्षण, पत्नी व मोठ्या बहिणीने केलं औक्षण अन्…

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३’चे यंदाचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ठरले. अफाट लोकप्रियता लाभलेले चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ उर्फ अशोक मामा यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आजवर अनेक चित्रपट, मालिका व नाटक या क्षेत्रातून विविधांगी भूमिका साकारत अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आणि त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांना या महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. (Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar)

कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार अशोक सराफ यांना देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान या आंनदी सोहळ्याचं जंगी सेलिब्रेशन अशोक सराफ यांच्या राहत्या घरी करण्यात आलं. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर ‘इट्स मज्जा’ने नुकतीच अशोक सराफ यांची भेट घेतली.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

यावेळी त्यांच्या राहत्या घरी या पुरस्कार सोहळ्याचा हा खास क्षण साजरा केला. अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांना ओवाळत त्यांचे आशीर्वाद घेतले. याशिवाय अशोक सराफ यांची मोठी बहीणही याप्रसंगी उपस्थित होती. मोठ्या बहिणीनेही भाऊरायाची ओवाळणी केली. त्यानंतर अशोक सराफ व निवेदिता सराफ या दोघांनी त्यांच्या मोठ्या बहिणीचे आशीर्वाद घेतले. सराफ कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झालेला यावेळी पाहायला मिळाला.

आणखी वाचा – अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून अभिनंदन, राज्यसरकारचेही मानले आभार, म्हणाले, “कलाकारांचा तुटवडा नाही पण…”

यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मानकरी अशोक सराफ ठरताच अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी व राजकीय नेते मंडळींनीही अशोक सराफ यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

Tags: ashok sarafashok saraf award celebrationashok saraf maharashtra bhushan purskarentertainmentnivedita saraf
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ankita Lokhande Troll

Video : "हेच जर विकीने केलं असतं तर…", नवीद सोलेबरोबर जवळीक साधताना दिसताच अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, "असुरक्षित…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.