सिनेसृष्टीत सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची. यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देऊन गौरविण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार मंगळवारी जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. सर्वस्तरावरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. (Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar)
अशोक सराफ यांच्या या खास क्षणाचं जंगी सेलिब्रेशन त्यांच्या राहत्या घरी करण्यात आलं. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर ‘इट्स मज्जा’ने नुकतीच अशोक सराफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या या खास क्षणाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. यावेळी सराफांच्या घरी आनंद पसरलेला पाहायला मिळाला. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी पतीचे औक्षण करत त्यांचे आशीर्वाद घेतलेले पाहायला मिळाले. शिवाय या आनंदा प्रसंगी अशोक सराफ यांची मोठी बहीणही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, अशोक सराफ यांचं त्यांच्या मोठ्या बहिणीनेही औक्षण केलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर अशोक सराफ व निवेदिता यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीचे आशीर्वाद ही घेतले. या खास क्षणाला अशोक सराफ यांनी त्यांच्या आई वडिलांचेही आशीर्वाद घेतले. पत्नीसह त्यांनी आई वडिलांच्या फोटोला हार घालत त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवाय त्यांनी स्वामींच्या फोटोलाही हार घालत स्वामींचे आशीर्वाद घेतले. एकूणच अशोक सराफ यांच्या घरी आनंद पाहायला मिळत आहे.
यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मानकरी अशोक सराफ ठरताच अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी व राजकीय नेते मंडळींनीही अशोक सराफ यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मराठी मनोरंजन विश्वाबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या मामांनी साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं.