सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी हात धरत ढकललं आणि मग…; राखी सावंतने चाहतीला दिलेली वागणूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Savant Weird Behaviour

आधी हात धरत ढकललं आणि मग...; राखी सावंतने चाहतीला दिलेली वागणूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले...

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. विशेषतः सोशल मीडियावर राखी नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळते. अनेक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी काही ना काही हटके करताना दिसते. काही दिवसांपासून राखी तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश बरोबर फिरताना दिसत आहे. रितेश बरोबर पुन्हा पॅचअप केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर मध्यंतरी राखी तिच्या व आदिल खान दुराणीच्या भांडणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळाली होती. (Rakhi Savant Weird Behaviour)

आता राखी पुन्हा एकदा रितेश बरोबरच्या नात्यामुळे चर्चेत असल्याच दिसत आहे. अशातच राखीचा सोशल मीडियावरील एका व्हिडीओने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या पेजवरून राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये राखी नववधूसारखी तयार झालेली पाहायला मिळत आहे. सदर व्हिडीओमध्ये राखी नववधूसारखा ड्रेस परिधान करत ती रितेशसह डेटवर गेली असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – अभिनेते, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

डेटवरून आल्यानंतर ती गाडीत बसायला जात असतानाच काही चाहते मंडळी तिच्याभोवती फोटोसाठी जमा होतात. त्या वेळेला राखीचा पारा चढतो आणि राखी चाहतीच्या हाताला धरून तिला ढकलताना दिसत आहे. त्यावर ती महिला ठीक आहे, ठीक आहे पण तुम्ही असं करू नका असं म्हणते. त्यावर मागे फिरलेली राखी, मग तुम्हीही असं करू नका असं म्हणते. त्यानंतर काही पापराजी राखीचे फोटो क्लिक करताना दिसतात, ही गोष्ट राखीच्या लक्षात येताच राखी त्या चाहतीचा हात सोडते आणि पुन्हा एकदा तिला फोटो काढायला जवळ बोलावते. ती चाहतीही राखीबरोबर फोटो काढायला पुन्हा पुढे येते आणि राखीबरोबर सेल्फी घेताना दिसते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी राखीवर भडकलेले पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – हुबेहूब कालकेय! गौरव मोरेच्या नव्या लूकची रंगलीय चर्चा, नेटकऱ्यांनी अभिनेत्यासह मेकअप दादांचंही केलं कौतुक, म्हणाले….

राखीबरोबरचं नेटकरी त्या चाहतीलाही सुनावताना दिसत आहेत. आधी तिचा हात का धरला आणि तिला का ढकललं आणि नंतर तिच्याबरोबर फोटो घ्यायला लावला हे सगळं पाहून राखीवर नेटकरी नाराज असलेले पाहायला मिळत आहेत.

Tags: rakhi savant fan momentrakhi savant trollrakhi savant viral videoRakhi Savant Weird Behaviour
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
sharayu sonavane wedding moment

सासरी हसतहसत गेली 'पारू' फेम शरयू सोनावणे, आईला मिठी मारत आनंदात दिसली अन्…, न रडलेल्या नवरीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.